वाशिंग्टन: कुणावर कशी वेळ येईल हे त्या वेळेलाही कदाचित सांगता येणार नाही. आज श्रीमंतीच्या बढाया मारणारा व्यक्ती 'रावाचा रंक' कधी होईल हे त्यालाही समजणार नाही. अशी अनेक उदाहरणं आपल्या आजूबाजूला सापडतील. मोहम्मद खालिद पाएंदा यांचीही कथा अशीच काहीशी आहे. मोहम्मद खालिद पाएंदा हे काहीच महिन्यांपूर्वी अफगाणिस्तानचे अर्थमंत्रीपद सांभाळत होते. आता त्यांना उदरनिर्वाहासाठी अमेरिकेत उबर टॅक्सी चालवावी लागते. 


उदरनिर्वाहासाठी टॅक्सी ड्रायव्हर
मोहम्मद खालिद पाएंदा यांना आत अमेरिकेतील रस्त्यांवर उबेर टॅक्सी चालवावी लागते. काहीच महिन्यांपूर्वी ते अफगाणिस्तानचे अर्थमंत्री होते. तालिबान्यांनी अफगाणिस्तानमधील काबुलवर ताबा मिळवण्यापूर्वी काहीच दिवसांपूर्वी मोहम्मद खालिद पाएंदा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते कुटुंबासह अमेरिकेला स्थलांतरीत झाले. सध्या ते अमेरिकेतील जॉर्जटाऊन युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर म्हणून काम करत असले तरी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ते पार्टटाईम टॅक्सी चालवतात. 


एकेकाळी सहा अब्ज डॉलर्सचा अर्थसंकल्प मांडणाऱ्या व्यक्तीला आज टॅक्सीच्या 50 फेऱ्या पूर्ण केल्यानंतर दोन दिवसांचा बोनस म्हणून केवळ 95 डॉलर्स मिळतात.


अफगाणिस्तानच्या या परिस्थितीला अमेरिका जबाबदार
मोहम्मद खालिद पाएंदा यांनी अफगाणिस्तानच्या आजच्या परिस्थितीला अमेरिका जबाबदार असल्याचं सांगितलं. अमेरिकेने मानवतावादी दृष्टीकोनापासून पळ काढला आणि अफगाणिस्तानमधून सैन्य माघार घेण्याचा एकतर्फी निर्णय घेतला. त्यामुळे तालिबान्यांनी त्या देशावर कब्जा मिळवला असल्याचा आरोप मोहम्मद खालिद पाएंदा यांनी केला आहे. 


अमेरिकेने अफगाणिस्तानमधून सैन्य माघार घेतल्यानंतर अवघ्या काहीच दिवसांमध्ये अश्रफ घनी सरकार कोलमडलं. तालिबानी दहशतवादी गटाने शस्त्रांच्या सहाय्याने या देशावर संपूर्ण कब्जा केला. 


महत्त्वाच्या बातम्या: