China Plane Crash: चायना इस्टर्न एअरलाइन्सचे विमान क्रॅश झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये 133 प्रवाशी असल्याची माहिती मिळत आहे. हे विमान कुनमिंगहून ग्वांगझूला 133 प्रवाशांना घेऊन जात होते. यावेळी या विमानाचा गुआंग्शी प्रदेशात अपघात झाला. अपघात झालेले विमान हे  जेट बोईंग 737 विमान होते. 


 






चायना इस्टर्न एअरलाइन्सच्या विमानाचा कुनमिंगहून ग्वांगझूला 133 प्रवाशांना घेऊन जात असताना गुआंग्शी प्रदेशात अपघात झाला. या अपघातानंतर विमान कोसळलेल्या डोंगरावर मोठी आग लागली. अपघातग्रस्त जेट हे बोईंग 737 विमान होते. या अपघातातील मृतांची संख्या मात्र अद्याप कळू शकली नाही, अशी माहिती रॉयटर्स वृत्तसंस्थेनं दिली आहे.