Miss universe 2021 : चंदीगड गर्ल हरनाज संधू विश्वसुंदरी (Miss Universe 2021) स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करतेय. या स्पर्धेची आज अंतिम फेरी पार पडणार आहे. 21 वर्षीय हरनाज संधूने नुकताच 'मिस डीवा मिस यूनिवर्स इंडिया 2021' किताब आपल्या नावे केला. त्यानंतर हरनाजने मिस युनिवर्स स्पर्धेची तयारी सुरु केली. यंदाचं विश्वसुंदरी स्पर्धेचं 70वं वर्ष आहे. हरनाजची विश्वसुंदरीसाठी स्पर्धा करणाऱ्या टॉप 10 सुंदरीमध्ये निवड झाली आहे. ती आता विश्वसुंदरीचा किताब पटकावण्याच्या आणखी एक पाऊल जवळ पोहोचली आहे.
कोण आहे हरनाज संधू?हरनाज संधू चंदीगडची राहणारी असून ती पेशाने मॉडेल आहे. तिने पंजाबी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. हरनाझ ‘यारा दियां पू बारां’ आणि ‘बाई जी कुट्टांगे’ या पंजाबी चित्रपटात झळकली आहे. तिने अनेक सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेत विजय मिळवला आहे. त्याशिवाय ती अभ्यासातही हुशार आहे. तिचे पदवी शिक्षण पूर्ण झाले असून सध्या ती सध्या पदव्यूतर शिक्षण पूर् करत आहे. तिला घोडेस्वारी आणि पोहण्याची आवड आहे.
कमी वजनामुळे व्हायची चेष्टाविश्वसुंदरीच्या शर्यतीत असणारी हरनाज शाळेत असताना फार बारीक होती. तिच्या कमी वजनामुळे तिची अनेक वेळा चेष्टा व्हायची. यामुळे तिला नैराश्याचा सामना करावा लागला होता. मात्र तिच्या कुटुंबियांच्या मदतीने तिने यावर मात केली. आणि आरोग्याची काळजी घेतली.
हरनाझने मिळवलेले किताब2017 - टाईम्स फ्रेश फेस मिस चंदीगड2018 - मिस मॅक्स इमर्जिंग स्टार2019 - फेमिना मिस इंडिया पंजाब2021 - मिस इंडिया युनिवर्स
हरनाजच्या खांद्यावर मोठी जबाबदारीहरनाजला खात्री आहे की, ती भारतासाठी विश्वसुंदरीचा किताब पटकावेल. मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताला जिंकण्यासाठी ती सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे तिने सांगितले आहे. हरनाजने तिच्या आतापर्यंतच्या यशाचं श्रेत्र तिच्या आईला दिलं आहे. तिने सांगितले की, तिच्या प्रवासात तिच्या आईचं मोठं योगदान आहे.
इतर संबंधित बातम्या :
- Trending News : सलमान-कतरिनामुळे व्हायरल झाला चहावाला, जाणून घ्या काय आहे कारण?
- Goodbye 2021 : वर्षभरात 'या' अभिनेत्याने तोडले सर्व रेकॉर्ड, एका सिनेमासाठी घेतले कोट्यवधींचे मानधन
- Skin Care Tips : ब्लॅकहेड्सपासून सुटकेचा सोपा उपाय, 'हे' करुन पाहा...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
