थायलंड : थायलंडमध्ये (Thailand) एक विचित्र घटना समोर आली आहे. थायलंडमधील एका महिलेने ती काम करत असलेल्या तेलाच्या गोदामात स्फोट घडवून आणला. त्याच कारण ऐकाल तर तुम्बी चकीत व्हाल. ही महिला तिच्या बॉसवर रागावली होती आणि त्यामुळेच तिने एवढं मोठं पाऊल उचलल्याचं सांगण्यात येत आहे. या आगीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. 


संतप्त महिलेने तेलाच्या गोदामाला आग लावली
एका वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार, 38 वर्षीय एन श्रिया या महिलेने कागदाचा तुकडा पेटवला आणि तो इंधन कंटेनरवर फेकून दिला. ज्यामुळे कंपनीच्या नाखोन पाथोम येथील प्रापाकॉर्न ऑईलच्या गोदामाला भीषण आग लागली. कागदाचा तुकडा पेटवण्यासाठी लायटरचा वापर केल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 29 नोव्हेंबर रोजी घडली आहे.


29 नोव्हेंबरला घडली घटना
मीडिया रिपोर्ट्स आणि प्राथमिक तपासात समोर आले आहे की, एन श्रिया यांनी हे कृत्य बॉसला कंटाळून केले आहे. त्यांन बॉसला राग आला होता. या रागाच्या भरात त्यांनी 29 नोव्हेंबर रोजी कागदाच्या तुकड्याच्या वापर करत तेलाच्या गोदामाला आग लावली. कंपनीच्या गोदामात तेलाचा हजारो लिटर तेलाचा साठा असल्याने ही आग वेगाने पसरली. अग्निशमन दलाने अनेक बंबांच्या मदतीने शर्थीच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात आली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आगीमुळे सुमारे 9 मिलियनहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. 


सध्या या महिला कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली असून तिने जाळपोळ केल्याची कबुली दिली आहे. महिलेने एवढे मोठे पाऊल का उचलले, याबाबत अधिक ठोस माहिती मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.


इतर महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha