Goodbye 2021 : बॉलिवूडच्या सलमान खान, शाहरुख खानपासून अक्षय कुमारपर्यंत अनेक कलाकारांचा मोठा चाहतावर्ग आहे. या बड्या कलाकारांसाठी त्यांचे चाहते वेडे आहेत. बड्या कलाकारांचे सिनेमे चांगले नसले तरी त्यांच्या फॅन फॉलोइंगमुळे सिनेमे फ्लॉप ठरत नाहीत. 2021 वर्ष संपायला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. त्यानिमित्ताने जाणून घ्या कोणत्या अभिनेत्याने या वर्षात सर्वाधिक मानधन घेतले आहे.
2021 मध्ये एका सिनेमासाठी सर्वाधिक मानधन घेणारा बॉलिवूड अभिनेता दुसरा कोणी नसून खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमार आहे. अक्षय कुमारने नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'बेल बॉटम' या चित्रपटासाठी सुमारे 130 कोटी रुपये शुल्क आकारले आहे. त्यामुळे अक्षय कुमार आता बॉलिवूडचाच नाही तर भारतातील सर्वात महागडा अभिनेता झाला आहे.
'बेल बॉटम'चे वाढते बजेट लक्षात घेता अक्षय कुमारला वाशू भगनानी यांनी त्याच्या मानधनात 35 कोटींहून अधिक रक्कम कमी करण्याची विनंती केली आहे, अशी शक्यता वर्तवली जात होती. पण अक्षयने हे सर्व खोटे असल्याचे जाहीर केले.
अक्षय कुमारनंतर सलमान खान आणि शाहरुख खानचा नंबर लागतो. सलमान खानने 'राधे' चित्रपटाद्वारे 60 ते 70 कोटींची कमाई केली आहे. या वर्षी शाहरुख खानचा एकही चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. पण शाहरुख खान त्याच्या आगामी 'पठाण' चित्रपटासाठी 100 कोटी रुपये मानधन घेत आहे.
अक्षय कुमार बॉलिवूडमधील सर्वात महागड्या अभिनेत्यांच्या यादीत उजवा असण्याचे कारण म्हणजे त्याच्या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर मिळणारा जबरदस्त प्रतिसाद. त्याचा 'बेल बॉटम' हा चित्रपट फारसा खास नसला तरी त्याचा नुकताच प्रदर्शित झालेला 'सूर्यवंशी' आणि त्याच्या आधीच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता. 'हाऊसफुल 4', 'गुड न्यूज', 'मिशन मंगल' अशा सिनेमांचा यात समावेश करता येईल.
संबंधित बातम्या
GoodBye 2021 : 'सरदार उधम'पासून 'रश्मी रॉकेट'पर्यंत वर्षभरात 'या' चित्रपटांनी केले मनोरंजन
Kangana Ranaut Instagram Post : विकी-कतरिनाकडून कंगनाला खास भेट, फोटो शेअर करत दिली माहिती
Deepika Padukone Upcoming Film Project K : दीपिकाचा पुढील 'प्रोजेक्ट' प्रभाससोबत, अमिताभ बच्चनही महत्त्वाच्या भूमिकेत
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha