Racial Discrimination in US : अमेरिकेतीत (America) हिंदू (Hindu) सुरक्षित नाहीत असंच म्हणावं लागणार आहे. गेल्या काही काळात अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तींवरील हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. हिंदूंवरील हल्ल्याचं प्रमाण वाढताना दिसत आहे. आता पुन्हा एकदा हिंदूंवरील हल्ल्याची घटना समोर आली आहे. कॅलिफोर्नियामध्ये भारतीय वंश द्वेषी घटना समोर आली आहे. येथे एका व्यक्तीने वेगवेगळ्या घटनांमध्ये 14 हिंदू महिलांवर हल्ले केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या व्यक्तीने भारतीय पेहराव असलेल्या म्हणजे साडी नेसलेल्या किंवा इतर पारंपारिक पोशाख परिधान केलेल्या महिलांवर हल्ले केले. या व्यक्तीने 14 वेगवेगवेगळ्या घटनांमध्ये महिलांवर हल्ले केले.


कॅलिफोर्नियामध्ये एका अज्ञात व्यक्तीने भारतीय वंश द्वेषामुळे हिंदू महिलांवर हल्ले केले. या व्यक्तीने भारतीय पारंपारिक पोशाख आणि दागिने घालणाऱ्यां महिलांवर हल्ले केले. महिलांना धक्काबुक्की केली. त्यांच्या अंगावरील दागिने हिसकावले. सांता क्लारा काउंटी येथील पोलिसांनी दिलेल्या माहिती, या प्रकरणातील आरोपीची ओळख पटली असून 37 वर्षीय लॅथन जॉन्सन हा याला प्रकरणात अटक करण्यात आली आहे. जॉन्सनने हिंदू महिलांना लक्ष्य केले आणि त्यांच्यावर हल्ला करत त्यांचे दागिनेही हिसकावून पळ काढला. हिंदू महिलांवरील हल्ल्याच्या या घटना जून महिन्यामध्ये सुरू झाल्या. यानंतर सुमारे दोन महिने या व्यक्ती विविध ठिकाणी 14 महिलांना लक्ष्य केलं आणि त्यांच्यावर हल्ला केला.


आरोपींनी हिंदू महिलांना लक्ष्य केलं


ABC7 न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, या आरोपींने अनेक महिलांवर हल्ले करत त्यांना दुखापत केली आहे, त्यापैकी बहुतेक महिला 50 ते 73 वयोगटातील आहेत. एका प्रकरणात आरोपींनी एका हिंदू महिलेला जमिनीवर ढकलले, तिच्या नवऱ्याला बेदम मारहाण केली. यानंतर महिलेचा हार हिसकावून तो गाडीत बसून पळून गेला. तर आणखी एका प्रकरणात आरोपीच्या महिलेवर हल्ला केला, यावेळी महिलेच्या मनगटालाही दुखापत झाली.


आरोपीला होऊ शकते 'ही' शिक्षा


या घटनेतील आरोपी जॉन्सनला सांता क्लारा पोलीस विभाग आणि यूएस मार्शल कार्यालयाने अटक केली आहे. या दोषी आढळल्यास जॉन्सनला 63 वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते. या प्रकरणाची पुढील सुनावणी 4 नोव्हेंबर रोजी होणार आहे. जॉन्सनने चोरलेल्या हाराची किंमत सुमारे 35,000 डॉलर आहे.


वर्णद्वेषाच्या घटनांमध्ये वाढ


जिल्हा वकील कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, 'ज्या महिलांवर हल्ला झाला त्यापैकी जवळपास सर्व महिलांनी साड्या किंवा त्याच प्रकारचे इतर काही पारंपरिक पोशाख, बिंदी आणि दागिने घातले होते. 'हिंदू अमेरिकन फाउंडेशन'चे सदस्य समीर कालरा यांनी सांगितलं की, 'वंश द्वेष आणि त्यासंदर्भातील गुन्हे आणि ऑनलाइन हिंदूफोबिया (हिंदूंबद्दल द्वेष) वाढताना दिसत आहेत. या प्रकरणावर आम्ही न्याय मागू.'