Canada Shri Bhagvad Gita Park : कॅनडात हेट क्राईम (Hate Crime) भारतविरोधी कृत्यांत वाढ झाली आहे. कॅनडातील ब्राम्प्टन (Brampton) शहरात एक पार्कमध्ये तोडफोड झाल्याची घटना समोर आली आहे. भगवद् गीता (Bhagvad Gita Park) मध्ये ही तोडफोड झाली आहे. भारताने या घटनेचा निषेध केला आहे. तसेच कॅनडामधील भारतीय उच्चायुक्तालयाने पोलिसांना या प्रकरणी दोषींवर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
भगवद् गीता (Bhagvad Gita Park) पार्कमध्ये सध्या कोणताही साईनबोर्ड अद्याप लावलेला नाही. तसेच पार्कमध्ये कोणतीही तोडफोड झाल्याचे पुरावे मिळालेले नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. हा प्रकार घडल्यानंतर भारताने चिंता व्यक्त केली आहे.
ओटावास्थित भारतीय उच्चायुक्तालयाने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ब्राम्प्टन येथील भगवद् गीता (Shri Bhagvad Gita Park) झालेल्या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो. आम्ही कॅनाडातील अधिकाऱ्यांना तसेच पोलिसांना लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या पार्कला पूर्वी ट्रॉयर्स पार्क म्हणून ओळखले जात होते. त्यानंतर आता या पार्कचे नाव बदलण्यात आले असून आता भगवद् गीता पार्क (Bhagvad Gita Park) या नावाने ओळखले जाते. 28 सप्टेंबरला या पार्कचे अनावरण करण्यात आले.
ब्रॅम्पटनचे महापौर पॅट्रिक ब्राऊन यांनी पार्कमध्ये झालेल्या तोडफोडीच्या बातमीची पुष्टी करत निषेध केला आहे. आम्ही या कृतीचे समर्थन करत नाही. भगवद् गीता पार्कमध्ये उभारण्यात आलेले प्रतिकात्मक चिन्ह तोडण्यात आले आहे. स्थानिक पोलिस यासंबंधी तपास करत असून लवकरात लवकर ते चिन्ह दुरुस्त करण्यात येणार आहे. परराष्ट्र मंत्रालयाने कॅनडात राहणाऱ्या भारतीय नागरिकांना व विद्यार्थ्यांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. उच्चायुक्तालयाने अशा गुन्ह्यांची चौकशी करण्याचा आणि योग्य ती कारवाई करण्याचा आग्रह धरला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :