कोलंबो: श्रीलंकेतील बिघडलेली आर्थिक परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर आता पंतप्रधान महिंदा राजपक्षेंनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आपण श्रीलंकेच्या जनतेसाठी कोणताही त्याग करु शकतो असं त्यांनी काही वेळेपूर्वीच सांगितलं होतं. आता त्यांच्यावर वाढलेल्या दबावामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला आहे. तर श्रीलंकेवर आताल परकीय कर्जाचा विळखा घट्ट झाला असून तो आणखी घट्ट करण्यासाठी चीनने हालचाली सुरू केल्याचं सांगितलं जातंय. 


श्रीलंका हा देश 1948 साली ब्रिटनच्या तावडीतून स्वातंत्र्य झाला. तेव्हापासून आतापर्यंतचा विचार करता श्रीलंकेची सध्याची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. श्रीलंकेत सध्या प्रचंड महागाई, आर्थिक आणीबाणी आणि एक प्रकारचं अराजक माजलंय. यातून नेमकं बाहेर कसं यायचं याचा मार्ग श्रीलंकेला सापडत नाहीय. चीनच्या आजच्या या परिस्थितीला चीन जबाबदार असल्याचं सांगितलं जातंय. चीनने या देशाला कर्जाच्या विळख्यात पकडल्यानेच त्यातून सुटका होणं सध्यातरी अशक्य असल्याची परिस्थिती आहे. 


आता श्रीलंकेला पुन्हा कर्जाच्या खाईत लोटण्याचा चीनचा डाव असल्याचं दिसतंय. त्यासाठी चीनकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. मीडिया रिपोर्टने दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेला आणखी कर्ज देण्यासाठी चीनने तयारी सुरू केली आहे. सध्या चीनवर सहा अब्ज डॉलर्सचे कर्ज आहे. 


श्रीलंकेसमोर आर्थिक दिवाळखोरी आणि त्याविरोधात असलेला तरुणांचा संताप हे एकमेव आव्हान नाही. कारण देशांतल्या अस्थिरतेचा आणि कमकुवत नेतृत्वाचा फायदा घेऊन चीननं लंकेत आपले पाय भक्कम रोवलेत.


दरम्यान, श्रीलंकेत एप्रिल 2022 मध्ये अन्नधान्य महागाई 46.6 टक्क्यांच्या चिंताजनक पातळीवर पोहोचली होती. पहिल्या महिन्यात महागाई दर 30.21 टक्के होता. परदेशी चलनाच्या तुटवड्यामुळे श्रीलंकेला जीवनावश्यक अन्नपदार्थांचा पुरवठा योग्य प्रकारे होत नाही, त्यामुळे खाद्यपदार्थाच्या किमती खूप वाढल्या आहेत.


महत्त्वाच्या बातम्या: