Magawa Rat : सुरुंग आणि स्फोटकं शोधून हजारो लोकांचे प्राण वाचवणाऱ्या 'मागवा' (Magawa) उंदराने जगाचा निरोप घेतला आहे. या कामगिरीसाठी त्याला सुवर्ण पदकही मिळाले होते. पाच वर्षाची कारकिर्द पूर्ण करून हा उंदीर जून 2021 मध्ये सेवानिवृत्त झाला होता. मागावा नावाचा हा उंदीर कंबोडियामध्ये अनेक जिवंत बॉम्ब आणि भूसुरुंग वास घेऊन शोधले. मागवा उंदीर स्फोटकांचा वास सव्वीस पटीने अधिक वेगाने घेऊ शकत होता. मागवा या उंदाराचे वजन 1.2 किलो आणि लांबी 70 सेंटीमीटर इतकी होती. तो आठ वर्षांचा होता.
मागवा उंदराला नोंदणीकृत असलेल्या अपोपो (Apopo) नावाच्या चॅरिटने प्रशिक्षण दिले होते. ही संस्था टांझानिया येथील असून तिने आतापर्यंत अशा अनेक उदरांना प्रशिक्षण दिले आहे. प्रशिक्षित केलेल्या उंदरांना ही संस्था हिरो रॅट म्हणून संबोधते. जमिनीतील सुरुंग शोधून काढण्यासाठी या संस्थेकडून उंदरांना 1990 सालापासून प्रशिक्षण दिले जाते.
अपोपो संस्थेने दिलेल्या अहवालानुसार, मागवा उंदराने गेल्या आठवड्यात शेवटचा श्वास घेतला. मागवा उंदीर पूर्णपणे बरा होता, मात्र, वयोमानानुसार तो थकला होत. त्याने खाणेपिणे कमी केले होते. अपोपो संस्थेने प्रशिक्षण दिलेल्या उंदरांपैकी मागवा हा सर्वात यशस्वी उंदीर होता. त्याने सुरुंग शोधण्यासाठी एक वर्षाचे प्रशिक्षण घेतले होते. टेनिस कोर्टच्या आकाराच्या परिसरात फिरून मागावा अवघ्या 30 मिनिटांत बॉम्ब शोधू शकत होता तिथे पारंपारिक मेटल डिटेक्टरला हे काम करण्यासाठी चार दिवस लागले असते.
स्फोटकांमधील रासायनिक कंपाऊंड शोधण्यासाठी प्रशिक्षित, मागवा उंदराने 141,000 चौरस मीटर (1,517,711 चौरस फूट) म्हणजेच सुमारे 20 फुटबॉल मैदानांपेक्षा जास्त जमीन वास घेऊन स्फोटकं शोधून साफ केली होती. मागील वर्षी सप्टेंबरमध्ये मागवाला PDSA संस्थेने सुवर्ण पदक देऊन सन्मानित केलं होतं. मागील 77 वर्षांमध्ये मागवा हा असा एक उंदीर आहे ज्याला हा सन्मान मिळाला होता
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- Fetus Inside Egyptian Mummy : 2000 वर्ष जुन्या इजिप्शियन ममीच्या पोटात 28 महिन्यांचा गर्भ, आतापर्यंत कसा राहिला सुरक्षित?
- Covid Guidelines : केंद्र सरकारने 28 फेब्रुवारीपर्यंत वाढवले कोरोना निर्बंध, तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर निर्णय
- Omicron : कोरोनाची तिसरी लाट ओसरतेय? आरोग्य मंत्रालयाने दिली महत्त्वाची माहिती
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha