Pakistan Inflation : भारताचा शेजारी देश पाकिस्तान (Pakistan) सध्या मोठ्या आर्थिक संकटात (Pakistan Economic Crisis) अडकला आहे. पाकिस्तानमध्ये खाण्यापिण्याचे गंभीर संकट निर्माण झाले आहे. पाकिस्तानात पीठ, तेल, कांदा आणि डाळी यांसारख्या खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले आहेत. महागाई इतकी वाढली आहे की लोक दोन अन्नासाठी तडफडताना दिसत आहेत. पाकिस्तानवरील वाढते कर्ज, पेट्रोल-डिझेल आणि विजेच्या वाढत्या किमती, घटत चाललेला परकीय चलन साठा, जागतिक चलनवाढ, राजकीय अस्थिरता आणि जीडीपीच्या वाढीतील मंदी या सर्व समस्यांना तोंड देण्यासाठी पाकिस्तानला कठोर संघर्ष करावा लागत आहे. 


पंतप्रधान शेहबाज शरीफ यांच्या नेतृत्वाखालील सरकारने शॉपिंग मॉल आणि बाजारपेठा रात्री 8:30 नंतर बंद करण्याचे आदेश दिले आहेत. पाकिस्तानमधील वीजेचा साठाही संपुष्टात येताना दिसत आहे, यामुळे विजेचा वापर वाचवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.


खाद्यपदार्थांचे भाव गगनाला भिडले


पाकिस्तानमध्ये डाळ, पीठ, कांदा, तेल यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंचे दरही गगनाला भिडले आहेत. खाद्यपदार्थांच्या किंमती प्रचंड वाढल्यामुळे सर्वसामान्यांना हे परवडत नाही आहे. जीवनावश्यक विकत घेणे म्हणजे सर्वसामान्यांसाठी युद्ध लढण्यासारखे झाले आहे. पाकिस्तानमधील आर्थिक संकट इतके वाढले आहे की सरकारने काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील पाकिस्तानी दूतावासाच्या मालमत्तेचा लिलाव केला. पाकिस्तानातील लाहोरमध्ये पिठाचा मोठा तुटवडा आहे. जिथे बहुतांश दुकानांमध्ये पीठ मिळत नसल्यामुळे पिठाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. 


लाहोरमध्ये 3000 रुपयांना पीठ


पाकिस्तानातील 15 किलोच्या पिठाच्या पॅकेटची किंमत 3000 रुपयांच्या पुढे गेली आहे, असे पाकिस्तानी वृत्तवाहिनी एआरवाय न्यूजने म्हटले आहे. त्याचवेळी, डॉनच्या वृत्तानुसार, पाकिस्तान सरकारच्या युटिलिटी स्टोअर्स कॉर्पोरेशन (USC) मार्फत विकल्या जाणार्‍या साखर आणि तुपाच्या किमती 25 टक्क्यांनी वाढवून 62 टक्क्यांनी वाढवण्यात आल्या आहेत.


पाकिस्तानची कंगाल होण्याकडे वाटचाल


पाकिस्तानवरील आर्थिक संकट दिवसेंदिवस गडद होताना दिसत आहे. मालमत्ता विकून देश चालवण्याची वेळ पाकिस्तानवर आली आहे. पाकिस्तानच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. पाकिस्तानी मीडियाच्या बातमीनुसार अमेरिकेत तैनात असलेल्या पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना चार महिन्यांपासून पगार मिळाला नाही. एवढेच नाही तर पैसे न मिळाल्याने जर्मनीतील पाकिस्तानी दूतावासातील दैनंदिन कामकाजावर परिणाम झाला.


महत्त्वाच्या इतर बातम्या


Pakistan : 'बेगम और बच्चे चाहती है...', 60 मुलांच्या बापाची कहाणी तुम्ही नक्की वाचा