Kim Jong-un Daughter Photo : उत्तर कोरियाचा (North Korea) हुकुमशाह किंम जोंग उन (Kim Jong-un) त्याच्या गोपनीय लाईफस्टाईलमुळे नेहमी चर्चेत असतो. कधी किम जोंग उनच्या हेअरस्टाईलचे, कधी त्याच्या वाढत्या किंवा कमी झालेल्या वजनाचेही फोटो व्हायरल होतात. तर कधी या हुकुमशाहाने दिलेल्या निर्घृण शिक्षा चर्चेचा विषय बनतो. आता पुन्हा एकदा किम जोंग उन चर्चेत आला आहे. याचं कारण आहे किम जोंग उनची मुलगी. सध्या सोशल मीडियावर  (Social Media) किम जोंग उनच्या मुलीचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोतील मुलगी किम जोंग उनची मुलगी असल्याच्या दावा करण्यात येत आहे. हा फोटो सध्या प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.


उत्तर कोरियामध्ये (North Korea) एका कार्यक्रमामधील मुलीचा एक फोटो व्हायरल झाला आहे. हुकुमशाह किम जोंग उन स्वत:च्या कुटुंबाला मीडियापासून दूर ठेवत असल्याचं नेहमी दिसून येतं. त्यामुळे त्याच्या कुटुंबियांबद्दल अधिक माहिती उपलब्ध नाही. अशात आता हुकुमशाहाच्या मुलीचा फोटो व्हायरल झाल्याचं बोललं जात आहे. उत्तर कोरियामध्ये आयोजित एका कार्यक्रम स्थानिक वृत्तवाहिन्यांवर प्रदर्शित करण्यात आला. या कार्यक्रमादरम्यानचा एका मुलीचा फोटो सध्या चर्चेत आहे. या फोटोतील मुलीनं सर्वांचंच ध्यान आकर्षित केलं आहे. काही लोकांच्या मते, या फोटोंमध्ये दिसणारी मुलगी किम जोंग उनची एकुलती एक मुलगी जु-ए असल्याचं बोललं जातं आहे.


कार्यक्रमात डान्स करताना दिसली जु-ए?


यूके डेली मेल वृ्त्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर कोरियाचा स्थापना दिनानिमित्त एक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात काही मुलांच्या गट एक गाणं सादर करत होता. या मुलांमध्ये जु-ए ही असल्याचा दावा केला जात आहे. या मुलीचे फोटो सध्या भरपूर व्हायरल झाले आहेत. या कार्यक्रमाला किम आणि त्याची पत्नी री सोल-जू यांनी हजेरी लावली होती. किम जोंगची पत्नी री सोल-जू या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या इतर मुलांना भेटून त्यांना शाबासकीची थाप देताना पाहायला मिळालं.


जू-एचा जन्म 2013 मध्ये झाला होता


मीडिया रिपोर्टनुसार, किम जोंगची कथित मुलगी जू-ए या कार्यक्रमाला उपस्थित होती. यावेळी जु-ए किम जोंग उनची पत्नी री सोल-जू हिच्याशी जू-ए परिचित असल्याचं जाणवलं. ज्यावेळी इतर मुले उत्तर कोरियाच्या हुकूमशाहाच्या आजूबाजूला भेटताना, उत्साहाने उड्या मारताना दिसली, त्यावेळी किम जोंगची कथित मुलगी जू-ए एका बाजूला शांत उभी असल्याचं पाहायला मिळालं. एवढंच नाही तर कॅमेराही या मुलीवरच फोकस होता. जू-एचा जन्म 2013 मध्ये झाला.