Vladimir Putin : अमेरिकेचा माजी गुप्तहेर एडवर्ड स्नोडेन (Edward Snowden) यांना राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी सोमवारी रशियन नागरिकत्व बहाल केले. 39 वर्षीय स्नोडेन हा अमेरिकेची विश्वसनीय माहिती लीक करून 2013 मध्ये पळून गेला, त्यावेळी त्याला रशियामध्ये (Russia) आश्रय देण्यात आला. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी स्वाक्षरी केलेल्या आदेशानुसार एडवर्ड स्नोडेनलारशियन नागरिकत्व बहाल केले आहे. पुतिन यांनी नागरिकत्व बहाल केलेल्या 75 परदेशी नागरिकांमध्ये स्नोडेनचा समावेश आहे. हा आदेश सरकारी वेबसाइटवर शेअर करण्यात आला आहे.
अमेरिकेची विश्वसनीय कागदपत्रे लीक केल्याचा आरोप
अमेरिकेत खटला भरू नये म्हणून यूएस नॅशनल सिक्युरिटी एजन्सीचा स्नोडेन हा 2013 पासून रशियात राहत आहे. स्नोडेनवर अमेरिकन सरकारच्या कार्यक्रमांची माहिती देणारी विश्वसनीय कागदपत्रे लीक केल्याचा आरोप आहे. अमेरिकेचे नागरिकत्व न सोडता रशियन नागरिकत्वासाठी अर्ज करण्याची आपली योजना असल्याचे स्नोडेनने यावेळी सांगितले.
अमेरिकेला मुद्दाम डिवचल्यासारखे पुतीन यांचे कृत्य
स्नोडेनने नॅशनल सिक्युरिटी एजन्सीची (NSA) महत्वाची कागदपत्रे संपूर्ण जगासमोर लीक करून अमेरिकेचा पर्दाफाश केला होता. त्यांनी NSA च्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय नजर ठेवण्यारे महत्वाचे ऑपरेशन्स जगासमोर आणले. हेरगिरीच्या आरोपाखाली गुन्हेगारी खटल्याला सामोरे जावे, यासाठी स्नोडेन अमेरिकेत परत यावे अशी अमेरिकन अधिकाऱ्यांची अनेक वर्षांपासून इच्छा होती. पुतीन यांनी स्नोडेनला नागरिकत्व दिल्यानंतर अमेरिकेला मुद्दाम डिवचल्यासारखे दिसत आहे. युक्रेनवर आक्रमण केल्यापासून अमेरिकेच्या नेतृत्वाखालील पाश्चात्य देशांनी रशियावर कठोर आर्थिक निर्बंध लादले आहेत.
अमेरिकेत या आणि न्यायाला सामोरे जा'
अमेरिकेचे नागरिकत्व न सोडता रशियन नागरिकत्वासाठी अर्ज करण्याची आपली योजना असल्याचे स्नोडेनने यावेळी सांगितले. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते नेड प्राइस यांनी सोमवारी सांगितले की, एडवर्ड स्नोडेनच्या "अमेरिकन नागरिकत्व" स्थितीतील कोणत्याही बदलाबाबत अमेरिकेला माहिती नाही. आमच्या पक्षात कोणताही बदल झालेला नाही, असे ते म्हणाले. स्नोडेनने अमेरिकेत परत यावे आणि इतर अमेरिकन नागरिकांप्रमाणे न्यायाला सामोरे जावे.
स्नोडेनची पत्नीही करणार अर्ज
अमेरिकेकडून सांगण्यात आले की, दोन्ही देशांमधील तणाव शिगेला पोहोचला असताना पुतिन यांनी एका अमेरिकन नागरिकाला नागरिकत्व बहाल केले आहे. स्नोडेनचे वकील अनातोली कुचेरेना यांनी रशियन राज्य वृत्तसंस्था आरआयए नोवोस्ती यांना सांगितले की, स्नोडेनची पत्नी लिंडसे मिल्स, जी अमेरिकन आहे आणि रशियामध्ये त्याच्यासोबत राहते, ती देखील रशियन आहे. ती देखील रशियन पासपोर्टसाठी अर्ज करेल