North Korea : उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन (Kim Jong Un) नेहमी कोणत्या न कोणत्या विचित्र कारणामुळे चर्चेत असतो. उत्तर कोरियातील नागरिकांवर लादलेल्या विचित्र निर्बंधांमुळे त्याच्या वेगवेगळ्या बातम्या समोर येतात. उत्तर कोरियाचा जगाशी तसा फारसा संबंध नाही, त्यामुळे तेथील घडामोडी जास्त प्रकाशझोतात येत नाहीत. पण, याच कारणामुळे उत्तर कोरियाबद्दल जाणण्याचं सर्वांना आकर्षण आहे. त्यातीलच एक मुख्य कारण म्हणजे उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन यांची लाईफस्टाईल. किम जोंग उन अतिशय आरामदायक आयुष्य जगतो असं सांगितलं जातं. त्यातच आता एका युट्युबरने केलेल्या दाव्यामुळे किम जोंग उन पुन्हा चर्चेत आला आहे. 


किम जोंग उनची लॅविश लाईफस्टाईल


एका कोरियन युट्युबरने किम जोंग उनच्या आयुष्याबाबत धक्कादायक दावा केला आहे. एका कोरियन युट्युबरने दावा केला आहे की, किंम जोंग उन दरवर्षी 25 कुमारी मुलींसोबत शारीरिक संबंध ठेवतो. किम जोंग उनच्या शरीरसुखाची इच्छा पूर्ण करण्यासाठी एक खास पथक आहे, ज्याला प्लेजर स्क्वॉड असं म्हटलं जातं. या प्लेजर स्क्वॉडमध्ये देशातील तरुण आणि सुंदर मुलींना भरती केलं जातं, ज्यांचं काम फक्त किम जोंग आणि उच्च अधिकाऱ्यांना खुश करणं असतं.


उत्तर कोरियाचा हुकूमशाहाचा 'प्लेजर स्क्वॉड'


द डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, योनमी पार्क या कोरियन युट्युबरने दावा केला आहे की, किम जोंग उन दरवर्षी 25 अल्पवयीन तरुणींची निवड करुन त्यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवतो. या तरुणींची निवड सुंदरता आणि आर्थिक, राजनैतिक परिस्थितीच्या आधारे केली जाते. सुंदर अल्पवयीन मुली आणि तरुणींची भरती या प्लेजर स्क्वॉडमध्ये केली जाते. योनमी पार्कने सांगितलं आहे की, दोन वेळा तिची निवड प्लेजर स्क्वॉडसाठी झाली होती, मात्र आर्थिक परिस्थितीमुळे तिची निवड पुढे रद्द झाली. 


शाळांमधून निवडल्या जातात कुमारी मुली


प्लेजर स्क्वॉड तयार करण्यामागचा उद्देश किम जोंग उन आणि उच्च अधिकाऱ्यांचं मनोरंजन करणे, हा आहे. किम जोंग उनच्या प्लेजर स्क्वॉडची निवड करण्यासाठी अधिकारी देशभरात शाळा आणि कॉलेजमध्ये जातात आणि वर्जिन म्हणजे कुमारी मुलींचा शोध घेतात. मुलगी कुमारी आहे की नाही, हे जाणण्यासाठीही त्यांची चाचणी केली जाते.


प्लेजर स्क्वॉड तयार करण्याची कल्पना कुणाची?


मीडिया रिपोर्टनुसार, दिवंगत कोरियन हुकूमशाह किम जोंग इल यांचा असा विश्वास होता की, कुमारी मुलींशी शरीर संबंध ठेवल्याने माणूस दीर्घकाळ जगतो आणि अमर होतो. प्लेजर स्क्वॉड तयार करण्याची कल्पनाही किम जोंग इलचीच होती. त्यांनी 1970 मध्ये या विशेष पथकाची सुरुवात केली. किम जोंग इल यांचे 2011 मध्ये वयाच्या 70 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 


उत्तर कोरियातून पळून आलेल्या योनमी पार्कचा धक्कादायक दावा


या प्लेजर स्क्वॉडमधील शरीराचे आकारही खूप वेगळे असतात. किम जोंग इलला उंच मुली आवडत नव्हत्या, त्याला गोल चेहरा असलेल्या मुली आवडायच्या. तर किम जोंग यांना पाश्चिमात्य महिला आवडतात. किम जोंग उनची पत्नी देखील या प्लेजर स्क्वाडचा एक भाग होती, असं सांगितलं जातं.


हुकूमशाहच्या भीतीमुळे या मुलींचे कुटुंबीयही त्यांना या कामासाठी पाठवतात. यानंतर या मुली वयाच्या 20 व्या वर्षी पोहोचल्यानंतर नेत्यांच्या अंगरक्षकांसोबत त्यांचं लग्न लावून दिलं जातं. ही प्लेजर स्क्वॉडमधील सदस्यांसाठी सन्मानाची बाब असल्याचं पार्कने सांगितलं. योनमी पार्क उत्तर कोरियातून पळून आलेली आहे. योनमीने सांगितलं की, किम जोगं उनचं कुटुंब 'पेडोफाइल' आहेत, जे स्वतःला देव समजतात.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


North Korea : उत्तर कोरियामध्ये निवडणूक तर होते, पण मतं फक्त किम जोंगलाच; सरकारं कसं ठरतं माहितीय?