North Korea Election Process : उत्तर कोरिया (North Korea) चे नाव ऐकलं की हुकूमशाह किम जोंग उन (Kim Jong Un) चा चेहरा डोळ्यासमोर येतो. किम जोंगच्या हुकूमशाहीची (Supreme Leader of North Korea) जगभरात चर्चा आहे. उत्तर कोरियामध्ये लोकशाही नाही तर हुकूमशाही राजवट आहे. आज हीच उत्तर कोरियाची ओळख बनली आहे. किम जोंग उत्तर कोरियामध्ये तेथे दीर्घकाळ राज्य करत आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का की, उत्तर कोरियामध्ये निवडणुका होतात. किम जोंगचे विचित्र नियम आणि आदेशांना जनता कंटाळली आहे, असं असलं तरी तिथले लोक निवडणुकीत किम जोंगलाच निवडून देतात. उत्तर कोरियाच्या निवडणुका फार वेगळ्या पद्धतीने घेतल्या जातात. 


उत्तर कोरियामध्ये निवडणूक होते पण...


भारताप्रमाणेच उत्तर कोरियामध्येही लोक मतदान करतात. मतं मोजली जातात आणि निकाल जाहीर होतात आणि प्रत्येक वेळी निकाल सारखाच असतो. दरवेळी निवडणुकीत किम जोंगचं जिंकतो. गेल्या वेळी निवडणुका झाल्या तेव्हाही हुकुमशाह किम जोंग विजयी झाला होता आणि त्यांनी शंभर टक्के जागा जिंकल्या होत्या. उत्तर कोरियामध्ये निवडणुका नेमक्या कशा होतात आणि मतदान प्रक्रिया काय आहे. याबद्दल जाणून घ्या.


उत्तर कोरियातील निवडणूक कशी असतो?


भारतात ज्याप्रमाणे विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका घेतल्या जातात, त्याचप्रमाणे उत्तर कोरियामध्ये सर्वोच्च पीपल्स असेंब्ली आणि लोकल पीपल्स असेंब्लीच्या निवडणुका घेतल्या जातात. किम जोंग सर्वोच्च पीपल्स विधानसभा निवडणुकीद्वारे निवडून आले आहेत. ही निवडणूक दरवर्षी चार वेळा घेतली जाते. 


मतदान कसं केलं जातं?


इतर देशांप्रमाणेच उत्तर कोरियातही सार्वत्रिक निवडणुका होतात आणि देशातील सर्व लोक मतदानासाठी जातात. यावेळी मतदानाची टक्केवारी 98-99 टक्के आहे, कारण तिथे मतदान करणं आवश्यक आहे. फक्त उत्तर कोरियाच्या बाहेर असलेले लोक मतदान करू शकत नाहीत. उत्तर कोरियामध्ये मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेतल्या जातात आणि मतदानाचा निकाल देखील सुमारे 4 महिन्यांनी जाहीर केल जातो. ज्यांना मतदान केंद्रावर जाता येत नाही, त्यांना फोनद्वारे मतदान करावं लागतं.


निवडणुका कशाप्रकारे होतात?


उत्तर कोरियामध्ये हुकूमशाही कोणत्या स्तरावर आहे, हे तुम्ही अनेक वेळा ऐकलं असेल. उत्तर कोरियामध्ये निवडणूका होत असल्या तरी, किम जोंगच्या विरोधात कुणालाही उभं राहता येत नाही. महत्त्वाची बाब म्हणजे उत्तर कोरियाच्या निवडणुकीत किम जोंग उन एकटाच उभा राहतो आणि जिंकतो. मतदारांना किम जोंगच्याच पक्षाला मतदान करावं लागलं. या मतदानामध्ये, एक कार्ड असतं, ज्यामध्ये किम जोंगच्या पार्टीचं नाव लिहिलेलं असतं आणि मतदात्याला किम जोंगचा पक्ष आवडतो की नाही, हे निवडायचं असतं. किम जोंगच्या विरोधात जाणं म्हणजे काय, हे सर्वांनाच माहित आहे, त्यामुळेच तिथल्या प्रत्येक जण पक्ष आवडतो, असं मतदान करतो. मतदानावेळी येथे भीतीचं वातावरण असतं, मतदान केंद्रावर तोफ उभी केली जाते. अशा वातावरणात निकाल किम जोंगच्या बाजूने लागणं साहजिक आहे


निकाल कशाप्रकारे जाहीर होतो?


उत्तर कोरियामध्ये निवडणूक झाल्यानंतर अनेक महिन्यांनी निकाल येतो आणि निकालात किम जोंग बिनविरोध विजयी होतो. यावेळीही किम जोंगने 100 टक्के जागा जिंकल्या होत्या. 2019 मध्ये, उत्तर कोरियामध्ये एकूण 687 जागांसाठी निवडणुका झाल्या आणि कोरियाच्या वर्कर्स पार्टीचे उमेदवार विजयी झाले होते.