जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिका (South Africa) क्रिकेट बोर्डानं आगामी टी-20 वर्ल्ड कपसाठी (ICC T20 World Cup) संघ जाहीर केला आहे. आयसीसीच्या नियमानुसार 1 पर्यंत संघ जाहीर करावे लागणार होते. दक्षिण आफ्रिकेनं एडन मार्क्रमला (Aiden Markram) कॅप्टन केलं आहे. माजी कॅप्टन तेम्बा बवुमाला संघात स्थान देखील आलेलं नाही. 


अमेरिका आणि वेस्ट इंडीजमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ  जाहीर झाला असून एनरिच नॉर्खिया आणि क्विंटन डी कॉकला संघात स्थान मिळालं आहे. नॉर्खिया आणि क्विंटन डी कॉकला कराराच्या यादीतून वगळण्यात आलं होतं. मात्र, त्यांना संघात स्थान देण्यात आलं आहे. नॉर्खिया दुखापतग्रस्त झाल्यानंतर त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून सप्टेंबर 2023 पासून दूर राहिला होता. दुसरीकडे क्विंटन डी कॉकनं एकदिवसीय क्रिकेटमधून 2023 मध्ये निवृत्ती घेतली होती. याशिवाय त्यानं कसोटी क्रिकेटमधून 2022 मध्ये निवृत्ती घेतली होती. 


 दक्षिण आफ्रिकेतील टी-20 स्पर्धेतील चांगल्या कामगिरीसाठी रेयान रिकल्टॉन आणि ओट्टनिल बार्टमॅन यांना संघात स्थान मिळालं आहे. रिकल्टन यानं त्या स्पर्धेत 530 धावा केल्या होत्या. तर, बार्टमनं आठ मॅछमध्ये 18 धावा केल्या होत्या. 


युवा खेळाडूंच्या साथीला एडन मार्क्रम, क्विटन डी कॉक, रेझा हेन्ड्रिक्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर आणि ट्रिस्टन  स्टब्स या तगड्या फलंदाजांमुळं दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी दमदार झालेली आहे. 
 
दक्षिण आफ्रिकेच्या संघाच्या गोलंदाजीची प्रमुख जबाबदारी कगिसो रबाडा  आणि नॉर्खिया यांच्यावर असेल. त्यांना मार्को जनसेन आणि गेराल्ड कोतजिया आणि बजोर्न फोर्ट्युई, केशव महाराज, तबरैझ शम्सी हे दक्षिण आफ्रिकेचे प्रमुख गोलंदाज असतील. 


दक्षिण आफ्रिकेचा संघ :


एडन मार्क्रम (कॅप्टन), ओट्टनील बार्टमन,गेराल्ड कोतजिया,क्विंटन डी कॉक, बजोर्न फोर्ट्युई, रेझा हेन्ड्रिक्स, मार्को जनसेन, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, डेव्हिड मिलर, एनरिक नॉर्खिया, कगिसो रबाडा, रेयान रिकेल्टन, तबरैज शम्सी, ट्रिस्टन स्टब्स 


राखीव खेळाडू : नांद्रे बर्गर, एल. एनगिडी



दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा माजी कॅप्टन कगिसो रबाडाला मात्र टी-20 संघात स्थान देण्यात आलेलं नाही. कगिसो रबाडाला टी-20 वर्ल्डकपमधून वगळण्यात आलं आहे.  आतापर्यंत दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्या वर्ल्ड कपसाठी टीम जाहीर झाल्या आहेत. तर,  भारताचा संघ अद्याप जाहीर झालेली नाही. 


संबंधित बातम्या :


Ravindra Jadeja : सर रवींद्र जडेजाची टी-20 वर्ल्ड कप वारी हुकणार? दिग्गज खेळाडू इशारा देत नेमकं काय म्हणाला? इरफान पठाणचंही समर्थन


T20 World Cup 2024: अखेर सस्पेन्स संपणार,टी-20 वर्ल्ड कपसाठी आजच टीम इंडियाची घोषणा होण्याची शक्यता