एक्स्प्लोर
राष्ट्रसंघात पुन्हा पाकिस्तानचे वाभाडे
न्यूयॉर्क: संयुक्त राष्ट्रसंघात पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरिफ आणि भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या भाषणानंतर Right To Response अंतर्गत दोन्हीकडून प्रतिक्रीया येत आहेत. सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानचा मुखवटा फाडल्यानंतर पाकिस्तानच्या संयुक्त राष्ट्र संघातल्या राजदूत मलीहा लोधी यांनी काश्मीरमधील अशांततेचं खापर भारत पाकिस्तानवर फोडत असल्याचा आरोप केला. तसेच काश्मीर हा भारताचा कधीही अविभाज्य भाग नसल्याचे म्हटलं. यावर संयुक्त राष्ट्र संघातील भारतीय मिशमच्या प्रथम सचिव इनम गंभीर यांनी लोधींना चोख प्रत्युत्तर दिलं. त्यांनी पाकिस्तानने राष्ट्रसंघाला दिलेल्या आश्वासनांची आठवण करुन देत वाभाडे काढले. तसेच दहशतवादाला रोकण्यासाठी अब्जावधी डॉलरची मदत मिळवूनही पाकिस्तानच्याच धरतीवर दहशतवादाचे नंदनवन वसले आहे. यामागची कारण स्पष्ट करावीत अशी मागणी केली.
सुषमा स्वराज यांच्या भाषणानंतर पाकिस्तानच्या राजदून लोधी यांनी भारतावर बेच्छूट आरोप केले होते. Right To Response अंतर्गत प्रतिक्रिया देताना, सुषमा स्वराज यांचे सर्व अरोप निराधार असल्याचे लोधी यांनी म्हटलं. तसेच काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग कधीही नव्हता असं सांगत, या वादग्रस्त विषयावर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत निर्णय झाला नसल्याचं म्हटलं होतं. यावर भारताच्या राष्ट्रसंघातील भारतीय मिशमच्या प्रथम सचिव ईनम गंभीर यांनी पाकिस्तानला खडेबोल सुनावले. त्यांनी स्वराज यांनी आपल्या भाषणात काश्मीर प्रश्नावरुन पाकिस्तानला स्पष्ट संदेश दिला असल्याचे सांगितलं.
यावर लोधींनी पुन्हा आपलीच शेखी मिरवण्याचा प्रयत्न केला. उरीमधील हल्ल्याचा आधार घेत भारतच जगाचे लक्ष्य विचलीत करत असल्याचा आरोप केला. यावरही गंभीर यांनी पाकिस्तानला चांगलेच फैलावर घेतलं. त्यांनी पाकिस्तानला अयशस्वी राष्ट्र संबोधून, जे आपल्याच जनतेवर अनन्वित अत्याचार करत आहेत, ते दुसऱ्यांना सहिष्णूता, लोकशाही आणि मानवाधिकाराच्या उपदेशाचे डोस पाजत फिरत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
त्या म्हणाल्या की, ''दुसऱ्यांना उपदेशाचे डोस पाजणाऱ्या पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय समुदायांकडून दहशतवादाचा खात्मा करण्यासाठी अब्जावधी डॉलरची मदत केली जाते. पण तरीही याच देशात दहशतवाद्यांचे नंदनवन आहे. त्यामुळे त्यांच्या देशाची धोरणे दहशतवादाचा खात्मा करण्यास कितपत यशस्वी झाली आहेत? हे स्पष्ट त्यांनी करावं''. अशी मागणी केली.
तसेच पाकिस्तानने 2004 साली आपल्या नियंत्रणात असलेल्या भूभागाचा वापर भारताविरुद्धच्या कारवायांसाठी होऊ देणार नाही, असे आश्वासन राष्ट्रसंघाला दिले होते. या आश्वासनांची पाकिस्तानी वरिष्ठ पातळीवरुन कितपत पुर्तता केली हेही स्पष्ट करण्याची मागणी केली. विशेष म्हणजे, भारतीय सैन्यावर लोधींच्या आरोपांचा समाचार घेताना पाकिस्तानच्या सैन्य दलाने 1971मध्ये जी रक्तरंजित होळी खेळल्याची आठवण करुन दिली. त्या म्हणाल्या की, ''1971 साली पाकिस्तानी सैन्याने जे हत्याकांड केले त्यावर मत काय आहे? हे स्पष्ट करानं ''
पाकिस्तानचे चांगलेच वाभाडे काढताना जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तय्यबा, सिपाह, हरक आदी दहशतवादी संघटनांवर कितपत लगाम घालण्यात यश मिळवले आहे, हेही स्पष्ट करावे अशी मागणी केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement