वॉशिंग्टन: कोरोनामुळे देशात निर्माण झालेल्या बेरोजगारीचे कारण देऊन गेल्या वर्षी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्थलांतरितांसाठी असलेल्या ग्रीन कार्डवर निर्बंध घातले होती. ते निर्बंध आता राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी हटवले आहेत. असे निर्बंध अमेरिकेच्या हिताचे नाहीत असे जो बायडेन यांनी सांगितलं.


गेल्या वर्षी डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत कामासाठी येणाऱ्या परदेशी नागरिकांना देण्यात येणाऱ्या ग्रीन कार्डवर निर्बंध घातले होते. ते निर्बंध नंतर मार्च 2021 पर्यंत वाढवले होते. अशा प्रकारचे निर्बंध अमेरिकेच्या हिताचे नाहीत, त्यामुळे अमेरिकन अर्थव्यवस्थेचं नुकसान होतंय असं जो बायडेन यांनी सांगितलं.


USA: बायडेन यांच्या पर्सनल मॅनेजमेन्ट कार्यालयाच्या प्रमुखपदी भारतीय वंशाच्या किरण अहुजा यांची नियुक्ती


ग्रीन कार्डवरचे निर्बंध हटवताना जो बायडेन यांनी सांगितलं की या निर्बंधामुळे अमेरिकेचे नुकसान होत आहे. यामुळे अमेरिकेत राहत असलेल्या नागरिकांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना भेटायला अडचणी होत होत्या. या निर्बंधामुळे अमेरिकन उद्योग जगताचं मोठं नुकसान होत आहे. या ग्रीन कार्डच्या माध्यमातून जगभरातील प्रभावशाली आणि कौशल्य असणारे लोक अमेरिकेत येत असतात.


या कायद्यामुळे जवळपास एक लाख 20 हजार लोकांच्या कुटुंबांना त्यांच्या सदस्यापासून तोडण्यात आलं असा आरोप त्यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर ठेवण्यात आला होता. ग्रीन कार्डमुळे अमेरिकेतील स्थानिकांचे रोजगार हे बाहेरच्या नागरिकांनी हिरावल्याचा आरोप डोनाल्ड ट्रम्प हे नेहमी करायचे. त्यावर निर्बंध आणण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी हालचाली सुरु केल्या होत्या. कोरोना काळात आलेल्या आर्थिक मंदीने डोनाल्ड ट्रम्प यांना ती संधी मिळाली आणि त्यांनी ग्रीन कार्डवर थेट निर्बंध आणले होते.


अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी जो बायडेन यांनी ग्रीन कार्डवरचे हे निर्बंध काढणार असल्याचं आश्वासन दिलं होतं. अमेरिकेत येणाऱ्या कायदेशीर स्थलांतरितांवर बंदी घालणारा हा कायदा मागे घेत असल्याची घोषणा बुधवारी जो बायडेन यांनी केली.


Meena Harris: भारतातील लोकशाही धोक्यात असल्याच्या मीना हॅरिस यांच्या मतावर व्हाईट हाऊस नाराज