वॉशिग्टन: अमेरिकन राष्ट्रपती जो बायडेन यांनी त्यांच्या पर्सनल मॅनेजमेन्ट कार्यालयाच्या प्रमुखपदी भारतीय-अमेरिकन वंशाच्या किरण अहुजा यांची नियुक्ती केली आहे. अशा प्रकार अमेरिकन प्रशासनात उच्च स्थान प्राप्त करणाऱ्या किरण अहुजा या पहिल्याच भारतीय वंशाच्या व्यक्ती आहेत.
अमेरिकेच्या पर्सनल मॅनेजमेन्ट कार्यालयामध्ये जवळपास 20 लाख कर्मचारी काम करतात. 49 वर्षीय किरण अहुजा यांनी 2015 ते 2017 सालापर्यंत अमेरिकेच्या personnel and management (OPM) कार्यालयात चीफ ऑफ स्टाफ म्हणूनही काम केलं आहे.
United Airlines flight 328 | अमेरिकेच्या विमानाचे हवेत असताना इंजिन फेल आणि......
कोण आहेत किरण अहुजा?
किरण अहुजा यांच्याकडे सार्वजनिक सेवा क्षेत्रात दोन दशकाहून जास्त अनुभव आहे. किरण अहुजा यांनी 2015 ते 2017 सालापर्यंत अमेरिकेच्या personnel and management (OPM) कार्यालयात चीफ ऑफ स्टाफ म्हणूनही काम केलं आहे.
सध्या किरण अहुजा या Philanthropy Northwest या संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. त्यांच्या या संस्थेकडून परोपकारी कामे केली जातात. त्यांनी अमेरिकन न्यायालयात एक सिव्हिल राइट्स वकील म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. किरण अहुजा यांच्या नियुक्तीचे कॉग्रेसच्या सदस्या असलेल्या जुडी चु यांनी स्वागत केलं आहे. किरण अहुजा यांची नियुक्ती म्हणजे जो बायडेय यांनी एक चांगलं पाऊल उचललं अशी प्रतिक्रिया जुडी चु यांनी दिली आहे.
जो बायडेन यांनी त्यांच्या प्रशासनात अनेक नवे बदल केले असून त्यामध्ये मूळच्या भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिकांना मोठी संधी दिल्याचं दिसून येतंय.
Meena Harris: भारतातील लोकशाही धोक्यात असल्याच्या मीना हॅरिस यांच्या मतावर व्हाईट हाऊस नाराज