एक्स्प्लोर

Twitter killer | नऊ हत्या करणाऱ्या जपानच्या 'ट्विटर किलर' ला मृत्यूदंडाची शिक्षा

आत्महत्येचा विचार करत असल्याची पोस्ट सोशल मीडियावर टाकणाऱ्यांशी संपर्क करुन 9 लोकांचा खून केल्याचा आरोप या 'ट्विटर किलर' वर होता. हे सारे खून 2017 साली करण्यात आले होते.

टोकियो: जपानमध्ये ट्विटर किलिंगच्या खळबळ उडवून देणाऱ्या प्रकरणाचा निकाल लागला आहे. टोकियो जिल्हा न्यायालयाने मंगळवारी 'ट्विटर किलर' ला मृत्यूदंडाची शिक्षा दिली आहे. हा किलर आत्महत्या करण्याचा विचार असल्याच्या पोस्ट टाकणाऱ्या तरुणांशी संपर्क साधायचा आणि त्यांचा खून करायचा. ताकाहिरो शिराईसी असं या ट्विटर किलरचं नाव असून तो 30 वर्षाचा आहे. हे सारे खून आरोपीने स्वत:च्या मर्जीनं केले आहेत का मृत व्यक्तींनी तशी मागणी केली होती या गोष्टीवर न्यायालयात सुनावणी सुरु होती.

टोकियोच्या जिल्हा न्यायालयाने त्याला खून करणे, मृतदेहाचे तुकडे करुन फ्रिजमध्ये ठेवणे या गुन्ह्याबद्दल जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ट्विटर किलरने त्याच्यावर लावण्यात आलेले सर्व गुन्हे मान्य केले आहेत. ताकाहिरो शिराईसीच्या वकिलांनी न्यायालयात सांगितलं होतं की, "आपल्या अशिलाने मृत लोकांच्या संमतीने त्यांचा खून केला आहे. त्यामुळे या कायद्यांतर्गत त्याच्यावर खटला चालवण्यात यावा." न्यायालयाने त्यांची ही मागणी धुडकावली होती.

सरकारच्या वतीनं केस लढणाऱ्या वकिलांनी आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली होती. संबंधित आरोपीने त्याच्यावर ठेवण्यात आलेले सर्व आरोप मान्य केल्याने न्यायालयाने त्याला मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली आहे.

काय आहे प्रकरण? आपण आत्महत्या करणार असल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकाणाऱ्या 15 ते 26 वयाच्या तरुणांच्या शोधात ताकाहिरो शिराईसी असायचा. त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर आपल्याही मनात आत्महत्येचे विचार येत असून मी आपल्याला आत्महत्या करायला मदत करतो असं सांगायचा. जपानी भाषेत हॅंगमॅन असे नाव असलेल्या आपल्या ट्विटर अकाउंटच्या माध्यमातून संबंधित तरुणांना तो आपल्या घरी बोलवायचा आणि त्यांचा खून करायचा. नंतर त्या मृतदेहाचे तुकडे करुन ते फ्रिजमध्ये टाकायचा. ही सर्व प्रकरणे 2107 सालची आहेत. अशा प्रकारचे नऊ खून केल्याचं आरोपीनं न्यायालयात कबुल केलं आहे.

प्रकरण कसं उघडकीस आलं? टोकियो मध्ये एक 23 वर्षीय महिला गायब झाल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्या महिलेच्या शोधात ऑक्टोबर 2017 मध्ये पोलीस ताकाहिरो शिराईसी याच्या घरी पोहचले. तिथं त्यांना अनेक फ्रिजमध्ये मृतदेह ठेवल्याचं आढळलं. अधिक तपास केल्यानंतर ताकाहिरो शिराईसीने अशा प्रकारचे नऊ खून केल्याचं उघड झालं. या खून प्रकरणामुळे जपानमध्ये खळबळ उडाली होती.

या प्रकरणानंतर जपान सरकारने आणि सोशल नेटवर्किंग साइट्सनी आत्महत्येचा विचार मनात येणाऱ्या अशा प्रकारच्या तरुणांच्या मदतीसाठी प्रयत्न सुरु केले.

महत्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

France Protest :  महागाई, शाळा आणि खराब सार्वजनिक सेवांचा मुद्दा पेटला, 5 लाख लोक रस्त्यावर उतरले, 1200 जणांना अटक, पंतप्रधानांची माहिती 
फ्रान्समध्ये पुन्हा आंदोलक रस्त्यावर, महागाई आणि खराब सार्वजनिक सेवांचा मुद्दा पेटला, 5 लाख लोक रस्त्यावर
Student Protest: आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
University of Chicago Crime News: बाथरुममध्ये तरुणीसोबत नको नको ते घडत होते, बाहेर मुलं माझा कधी नंबर येणार बोलत बसले; युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोमधील हादरवणारी घटना
बाथरुममध्ये तरुणीसोबत नको नको ते घडत होते, बाहेर मुलं माझा कधी नंबर येणार बोलत बसले; युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोमधील हादरवणारी घटना
Who is Manarah Al Nahyan: तब्बल 300 अब्ज डॉलरची संपत्ती असलेल्या अबू धाबीच्या सत्ताधारी राजघराण्याची सून लंडनच्या रस्त्यावर बेशुद्ध सापडली, कोर्टाची जबरी शिक्षा, नेमकं घडलं तरी काय?
तब्बल 300 अब्ज डॉलरची संपत्ती असलेल्या अबू धाबीच्या सत्ताधारी राजघराण्याची सून लंडनच्या रस्त्यावर बेशुद्ध सापडली, कोर्टाची जबरी शिक्षा, नेमकं घडलं तरी काय?

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ratnagiri Crime News: जवळच्या मित्राला अन् मैत्रिणीला मेसेज पाठवला; मध्यरात्री दोघं घरी आले, शोध घेतला पण..., घराजवळच बांधकामाच्या ठिकाणी आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?
जवळच्या मित्राला अन् मैत्रिणीला मेसेज पाठवला; मध्यरात्री दोघं घरी आले, शोध घेतला पण..., घराजवळच बांधकामाच्या ठिकाणी आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?
Gwalior Accident News: ग्वालियरमध्ये मृत्यूचा हाहाकार! काळ बनून आलेल्या अनियंत्रित ट्रकने भाविकांना चिरडले;15 जणांचा दुर्दैवी अंत, 39 जण गंभीर जखमी
ग्वालियरमध्ये मृत्यूचा हाहाकार! काळ बनून आलेल्या अनियंत्रित ट्रकने भाविकांना चिरडले;15 जणांचा दुर्दैवी अंत, 39 जण गंभीर जखमी
Pune Crime News: बुरखा घालून दुकानात घुसले, कोयते-बंदुका काढल्या; शेजारच्या दुकानदारानं डोकावून पाहिलं अन्..., आरडाओरड्याने दरोडेखोरांची पळापळ!
बुरखा घालून दुकानात घुसले, कोयते-बंदुका काढल्या; शेजारच्या दुकानदारानं डोकावून पाहिलं अन्..., आरडाओरड्याने दरोडेखोरांची पळापळ!
Chandrapur Leopard Attack: महाकालीच्या दर्शनासाठी पायी चाललेल्या नऊ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याची झडप; ऐन वर्दळीत हल्ला अन् एकच थरकाप उडाला, चंद्रपूरच्या विसापुरात खळबळ!
महाकालीच्या दर्शनासाठी पायी चाललेल्या नऊ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याची झडप; ऐन वर्दळीत हल्ला अन् एकच थरकाप उडाला, चंद्रपूरच्या विसापुरात खळबळ!
Gokul Milk Union Election 2026 : गोकुळसाठी आज मतदान, उद्या गुलाल; 35 केंद्रांवर होणार मतदान, निवडणूक यंत्रणा सज्ज, उत्कंठा शिगेला
गोकुळसाठी आज मतदान, उद्या गुलाल; 35 केंद्रांवर होणार मतदान, निवडणूक यंत्रणा सज्ज, उत्कंठा शिगेला
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: चिपळूण, सांगलीसह अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी; आता किती दिवस कोसळणार?
चिपळूण, सांगलीसह अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी; आता किती दिवस कोसळणार?
Kolkata Stampede Marathi News: कुठे पर्स, कुठे विखुरलेल्या चप्पल; दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी, 19 जणांचा मृत्यू, कोलकातामधील थरकाप उडवणारे 8 फोटो
कुठे पर्स, कुठे विखुरलेल्या चप्पल; दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी, 19 जणांचा मृत्यू, कोलकातामधील थरकाप उडवणारे 8 फोटो
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
Embed widget