Israel-Hamas Conflict : सध्या इस्रायल आणि पॅलेस्टाईन (Israel Palestine Conflict) संघर्ष पेटला आहे. इस्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास (Hamas) कडून एकमेकांवर हल्ले प्रतिहल्ले सुरुच आहेत. हमास दहशतवादी इस्रायलमध्ये घुसून इस्रायली नागरिकांना लक्ष्य करत आहेत. पॅलेस्टिनी दहशतवादी हमासकडून इस्रायली नागरिकांचं अपहरण करून त्यांना ओलिस ठेवण्यात येत आहे. एका महिलेला बेदम मारहाण करुन तिची विवस्त्र धिंड काढल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इतकंच नाही तर, या महिलेल्या विवस्त्र मृतदेहावर ते जल्लोष करताना दिसत आहेत.


बेदम मारहाण करुन इस्रायली महिलेची विवस्त्र धिंड 


सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये हमास दहशतवादी एका छोट्या टेम्पोमध्ये बसल्याचं दिसत आहे. टेम्पोमध्ये मागच्या बाजूला एका महिलेला विवस्त्र मृतदेह दिसत आहे. या व्हिडीओमधून लक्षात येत की, या महिलेला बेदम मारहाण करण्यात आली असून तिचे हात-पाय तोडण्यात आलं आहेत. हमास दहशतवाद्यांनी महिलेले बेदम मारहाण करुन विवस्त्र धिंड काढली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष पेटला


हमासने शनिवारी, 7 ऑक्टोबरला इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला केला. त्यानंतर इस्रायलकडून चोख प्रत्युत्तर देत गाझा पट्टीतील हमासच्या ठिकाणांवरही हल्ले करण्यात येत आहे. आता हा वाद आणखी पेटला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, हमासने गाझा पट्टीतील लोकांना ओलीस ठेवले असून त्यात महिला, मुले आणि वृद्धांचा समावेश आहे. एवढंच नाही तर हमासने गाझा पट्टीजवळील गावेही ताब्यात घेतली आहेत.


हमासच्या हल्ल्यामागे इराणचा हात


दरम्यान, इराण मात्र या हल्ल्याचा आनंद साजरा करत आहे. इराणमधील हजारो लोक रस्त्यावर उतरून आनंद साजरा करत आहेत. आता इस्रायलकडून मोठी प्रतिक्रिया आली आहे. वॉशिंग्टनमधील इस्रायल दूतावासाचे प्रवक्ते ताल नईम यांनी एबीपी न्यूजशी बोलताना सांगितलं की, या हल्ल्यामागे इराणचा हात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. हमासकडून इस्रायलवर 5000 हून अधिक क्षेपणास्रांचा मारा करण्यात आला आहेत. इस्रायलच्या स्थानिक वेळेनुसार सकाळी 6.30 वाजता हमासने हल्ला सुरू केला, अद्यापही हल्ले सुरुच आहेत.


गाझा पट्टीत तणावाचं वातावरण


इस्रायल आणि पॅलेस्टिनी समर्थक हमास यांच्यात युद्धाला सुरुवात झाली आहे. गाझा पट्टीतील हमासच्या ठिकाणांवर इस्रायल सातत्याने हल्ले करत आहे. गाझा पट्टीतील रहिवाशांना इस्रायलने सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचं आवाहन केलं आहे. इस्रायलच्या पंतप्रधानांनी हमासला गाझा पट्टीतून पळ काढण्याचा इशारा दिला आहे.


महत्वाच्या इतर बातम्या :


Israel-Palestine Conflict : लाईव्ह रिपोर्टिंग करताना रॉकेट हल्ला, थरारक क्षण कॅमेऱ्यात चित्रित; तुम्हीच पाहा नक्की काय घडलं?