Hamas-Israel Update : इस्रायल (Israel) आणि पॅलेस्टिनी (Palestine) दहशतवादी हमास (Hamas) यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा तापला आहे. इस्राइलमध्ये (Israel-Palestine Conflict) युद्धजन्य परिस्थितीमुळे आणीबाणी लागू करण्यात आली आहे. हमालकडून इस्रायलवर शनिवारी सुमारे 5000 क्षेपणास्रांचा मारा करण्यात आला. त्यानंतर रविवारीही रॉकेट हल्ले सुरुच आहे. लाईव्ह रिपोर्टींग करत असताना पत्रकाराच्या मागेच रॉकेट डागण्यात आलं. हा क्षेपणास्त्र हल्ल्याचा थरारक क्षण लाईव्ह टीव्हीवर दिसला आणि कॅमेऱ्यातही चित्रीत झाला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


लाईव्ह रिपोर्टिंग दरम्यान रॉकेट हल्ला


गाझा पट्टीतील पॅलेस्टिनी अतिरेक्यांनी शनिवारी इस्रायलवर अचानक हल्ला केला. यानंतरनंतर इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील वाढत्या संघर्षादरम्यान हमासने नवीन ऑपरेशन - ऑपरेशन अल अक्सा स्टॉर्म सुरू करण्याची घोषणा केली आहे. सोशल मीडियावर हमासच्या इस्रायलवरील हल्ल्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे. वृत्तवाहिनीवरील लाईव्ह रिपोर्टींगदरम्यानचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये अल-जजीरा टीव्हीची पत्रकार लाईव्ह रिपोर्टिंग करत असताना तिच्या मागेच क्षेपणास्र हल्ला झाला. यावेळी व्हिडीओमध्ये पत्रकार ओरडतानाही दिसत आहे. 


पाहा रॉकेट हल्ल्याचा व्हायरल व्हिडीओ :






आतापर्यंत 300 जणांचा मृत्यू


इस्रायलमध्ये हमासने केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत 300 जणांचा मृत्यू झाला आहे, तर जखमींची संख्या 1500 च्या पुढे गेली आहे. गाझामध्ये इस्रायलच्या हल्ल्यात प्राण गमावलेल्या पॅलेस्टिनींची संख्या 232 आहे. येथे 1700 लोक जखमी झाले आहेत. इस्रायलने गाझा पट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांना घरे सोडून सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगितले आहे.


इस्रायलकडून हमासच्या ठिकाणांवर निशाणा


अलजजिराच्या वृत्तानुसार, रविवारी पहाटेही इस्रायलचा गाझा पट्टीवर हल्ला सुरूच आहे. अलजजिराच्या रिपोर्टनुसार, गाझा शहरावर हवाई हल्ल्यांचे आवाज येत आहेत. या हवाई हल्ल्यात किती जणांना जीव गमवावा लागला आहे, याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. इस्रायल हमासच्या ठिकाणांना लक्ष्य करत आहे, त्यामुळे इस्रायलने गाझा पट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांना घरे सोडून सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगितलं आहे. 


विमान उड्डाणे रद्द


इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे राजधानी तेल-अविवला जाणारी अनेक विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. अमेरिकन एअरलाइन्स, एअर फ्रान्स, लुफ्थांसा, एमिरेट्स, रायनएअर आणि एगिन एअरलाइन्स यांनी तेल-अविव उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.


महत्वाच्या इतर बातम्या :


Israel-Palestine Conflict : आधी हात-पाय तोडले... मग इस्रायली महिलेची विवस्त्र धिंड; हमासच्या दहशतवाद्यांकडून माणुसकीला काळीमा