Israel Hamas War : हमाससोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान इस्रायली सैन्याने (Israel Hamas War) गाझा पट्टीच्या मध्य भागात प्रवेश केला आहे. इस्रायली सैन्याकडून दररोज जोरदार हल्ले केले जात आहेत. जवळपास तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या युद्धादरम्यान इस्रायली सैन्याने पॅलेस्टिनी भागातील 70 टक्के घरे उद्ध्वस्त केली आहेतत. सरकारी माध्यम कार्यालयाने ही माहिती दिली.
हल्ल्यांमध्ये 439,000 घरांपैकी सुमारे 300,000 घरे उद्ध्वस्त
अल जझीराच्या रिपोर्टनुसार, इस्रायलच्या बॉम्बहल्ल्यात 200 हून अधिक पुरातत्व स्थळे नष्ट झाली आहेत. वॉल स्ट्रीट जर्नलने अहवाल दिला आहे की इस्रायली हल्ल्यांमध्ये 439,000 घरांपैकी सुमारे 300,000 घरे उद्ध्वस्त झाली आहेत. सॅटेलाईट इमेज पाहिल्यानंतर अहवालात असे म्हटले आहे की गाझापट्टीवर टाकलेल्या 29,000 बॉम्बमध्ये निवासी क्षेत्रे, रुग्णालये आणि शॉपिंग मॉल यांना लक्ष्य केले गेले. अहवालानुसार, सर्व नागरी पायाभूत सुविधांचे इतके नुकसान झाले आहे की त्याची दुरुस्ती करणे शक्य सुद्धा नाही.
इतिहासात प्राणघातक ऑपरेशन असं कधीच झालं नाही
अहवालानुसार, इस्रायलने 2012 ते 2016 या दोन महिन्यांत सीरियातील अलेप्पो, युक्रेनमधील मारियुपोल आणि दुसऱ्या महायुद्धात जर्मनीवर मित्र राष्ट्रांनी केलेल्या बॉम्बहल्ल्यांच्या तुलनेत अधिक विनाश घडवला आहे. तज्ञांचे म्हणणे आहे की गाझामधील इस्रायली लष्करी मोहीम आता अलीकडील इतिहासातील सर्वात प्राणघातक आहे, ज्यामध्ये 21,500 हून अधिक लोक मारले गेले आणि 55,000 जखमी झाले. 7 ऑक्टोबर रोजी हमासच्या सैनिकांनी इस्रायलवर अचानक हल्ला करून युद्धाला सुरुवात केली होती. त्यानंतर इस्रायल गाझा पट्टीत घुसून प्रत्युत्तर देत आहे.
बॉम्बहल्ल्याबद्दल इस्रायलवर जगभरातून टीका
इस्त्रायली लष्कराचा दावा आहे की ते हमास सैन्याला लक्ष्य करत आहेत, पण तज्ज्ञांनी इस्रायलवर गाझावर बॉम्बफेक केल्याची टीका केली आहे. 365 चौरस किमी (141 चौरस मैल) जमिनीवर 2.3 दशलक्ष लोकांचे निवासस्थान असलेल्या जगातील सर्वात दाट लोकवस्ती असलेल्या गाझावर इस्रायलने बॉम्बफेक करणे सुरूच ठेवले आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की मारले गेलेले बहुतेक नागरिक आहेत आणि त्यापैकी 70 टक्क्यांहून अधिक मुले, महिला आणि वृद्ध आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या