Israel-Palestine Escalation : इस्रायल आणि हमास (Israel Hamas War) यांच्या घनघोर युद्ध सुरुच आहे. 7 ऑक्टोबरला सुरा झालेल्या युद्धाचा आज नववा दिवस आहे. या युद्धात इस्रायली नागरिक आणि पॅलेस्टिनी यांच्यासह अनेक परदेशी नागरिकांचा देखील मृत्यू झाला आहे. इस्रायल युद्धातील मृतांचा आकडा 4500 च्या पुढे पोहोचल्याची माहिती आहे. त्याशिवाय या संघर्षात 12 हजार हून अधिक लोक जखमी झाले आहेत. हमास आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे जगाची चिंता वाढली आहे. हे युद्ध थांबवण्यासाठी अनेक देश मध्यस्थी करण्यासाठी पुढे सरसावले आहेत.


इस्रायल-पॅलेस्टिनी युद्ध सुरुच


गाझा येथे इस्त्रायलच्या हवाई हल्ल्यात अनेक जण जखमी झाले आहेत. इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धात आतापर्यंत 2215 पॅलेस्टिनींना आपला जीव गमावला आहे, जखमींची संख्या 8,714 आहे. मृतांमध्ये 700 मुलांचाही समावेश आहे. वेस्ट बँकमध्ये आतापर्यंत 50 पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे. हमासच्या हल्ल्यामुळे इस्रायलमध्ये मृतांची संख्या 1300 वर पोहोचली आहे, तर 3400 लोक जखमी आहेत. 14 ऑक्टोबरपर्यंत इस्त्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरु आहेत.






197 भारतीयांची तिसरी तुकडी दिल्लीत दाखल


युद्धाच्या काळाज भारतासह इतर देशांतील नागरिकही इस्रायलमध्ये अडकले आहेत. इस्रायलमध्ये अडलेल्या भारतीयांची तिसरी तुकडी भारतात दाखल झाली आहे. यामध्ये तिसऱ्या तुकडीत 197 भारतीय मायदेशी परतले आहेत. याआधी इस्रायलमधून भारतीयांच्या दोन तुकड्या सुखरुप भारतात परतल्या आहेत. शुक्रवारी 13 ऑक्टोबर रोजी 235 भारतीयांची दुसरी तुकडी दिल्लीत पोहोचली. त्याआधी 212 भारतीय इस्रायलमधून सुखरुप भारतात परतले आहेत. 


इस्रायल गाझा पट्टीत 10 हजार सैनिक पाठवणार


गाझा शहराचा ताबा घेण्यासाठी आणि गाझा पट्टी नष्ट करण्यासाठी इस्रायलने 10,000 सैन्य पाठवण्याची योजना आखली आहे. न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, इस्रायलच्या लष्करी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने ही माहिती समोर आली आहे. या अहवालात म्हटले आहे की, 2006 च्या दुसऱ्या लेबनॉन युद्धानंतर हे सर्वात मोठं युद्ध असेल आणि इस्रायल लष्कर (IDF) तात्पुरता गाझाचा काही भाग काबीज करण्याचा प्रयत्न करेल.


इस्रायल-हमास युद्धात 12 पत्रकारांचा मृत्यू


इस्रायल-हमास युद्धात पत्रकारांचाही मृत्यू झाला असून काही पत्रकार जखमी झाले आहेत. हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यामुळे झालेल्या हिंसाचारात सुमारे 12 पत्रकारांचा मृत्यू झाला आहे, तर आठ जण जखमी झाले आहेत. कमिटी टू प्रोटेक्ट जर्नालिस्ट्सने शनिवारी एका निवेदनात ही माहिती दिली आहे.


महत्वाच्या इतर बातम्या :


Israel-Hamas War : मृत्यूच्या दाढेतून परतली! गाझामधील सुटकेनंतर भारतात परतलेल्या महिलेनं सांगितलं युद्दाचं धक्कादायक वास्तव