Israel-Palestine Conflict : इस्रायल आणि हमास (Israel-Hamas War) यांच्यात घनघोर युद्द सुरु आहे. दिवसेंदिवस त्यांच्यातील तणाव आणखी वाढताना दिसत आहे. 7 ऑक्टोबरला सुरु झालेल्या युद्धात आतापर्यंत 3000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. गाझा पट्टीवर इस्रायलकडून जोरदार प्रतिहल्ले सुरु आहेत. इस्रायलने गाझामधील नागरिकांना तेथून पलायन करण्यास सांगितलं. यानंतर अनेक नागरिकांनी गाझा सोडलं. इस्रायलच्या इशाऱ्यानंतर एका भारतीय महिलेनेही आपल्या कुटुंबासह गाझा सोडून इजिप्तच्या सीमेवर आली, त्यानंतर आता ती इजिप्तला जाण्याच्या तयारीत आहे. गाझा सोडलेल्या भारतीय महिलेनं तेथील युद्धाचं धक्कादायक वास्तव सांगितलं. त्या महिलेने सांगितलं की, इस्रायलने गाझामधील परिस्थिती फार वाईट आहे. रस्ते, घरे सगळं कोसळलं आहे. 


गाझामधून पळालेल्या भारतीय महिलेनं सांगितली परिस्थिती


जम्मू-काश्मीरमध्ये राहणारी लुबना नजीर शाबू ही भारतीय महिला गाझा येथून परतली. या महिलेने सांगितलं की, इस्रायलकडून करण्यात येणाऱ्या बॉम्बहल्ल्यात गाझामधील इमारती आणि रस्त्यांचं नुकसान झालं आहे. वाहतुकीसाठी सुरक्षित रस्तेही शिल्लक नाहीत. शाबू यांनी सांगितलं की, ''मी सकाळी माझ्या पती आणि मुलीसह घर सोडले आणि सीमेजवळील गाझाच्या दक्षिणेकडील भागात पोहोचण्यासाठी मला अडचणींचा सामना करावा लागला.''


शाबू गाझा येथे वास्तव्यास होती. पण आता या भारतीय महिलेनं आपल्या कुटुंबासह आपले घर सोडलं असून हमासचं क्षेत्र सोडण्यासाठी सुरक्षित मार्गाची वाट पाहत आहे. शाबू तिच्या कुटुंबियांसह इजिप्तच्या दक्षिण सीमेवर आहे. इस्रायलने शुक्रवारी सुमारे 1.1 दशलक्ष पॅलेस्टिनींना उत्तर गाझा येथून बाहेर पडण्याचं आणि दक्षिणेकडील भागात जाण्याचे आदेश दिले. शाबूने सांगितलं की, इस्रायली बॉम्बस्फोटामुळे सर्व रस्ते खराब झाले आहेत आणि वाहतुकीचीही समस्या निर्माण झाली आहे. 


इस्रायली सैन्याकडून वैद्यकीय कर्मचाऱ्यांना लक्ष्य


पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालयाने इस्रायली सैन्यावर गंभीर आरोप केले आहेत.  मानवतावादी मोहिमेदरम्यान इस्रायली सैन्याने वैद्यकीय आणि रुग्णवाहिका कामगारांना लक्ष्य करून त्यांची हत्या केल्याचा आरोप पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालयाने केला आहे. पॅलेस्टिनी मंत्रालयाने म्हटलं आहे की, शुक्रवारी हवाई हल्ल्यात सुमारे 15 वैद्यकीय केंद्रांचं नुकसान झालं आणि 23 रुग्णवाहिका नष्ट झाल्या.


इस्रायल-हमास युद्धात 3000 हून अधिक लोकांचा मृत्यू


इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या 7 दिवसांपासून विनाशकारी युद्ध सुरू आहे. या काळात सुमारे 1300 इस्रायली मारले गेले आणि 3418 जखमी झाले आहेत. इस्रायलच्या हल्ल्यात गाझामधील सुमारे 1900 लोकांचा मृत्यू झाला असून सुमारे 7500 हून जण जखमी झाले आहेत.


महत्वाच्या इतर बातम्या :


Isreal PM Netanyahu's Son: देशासाठी लढ, नेत्यानाहूंनी मुलाला सैन्यासोबत पाठवलं, व्हायरल फोटोमागचं सत्य काय?