Israel-Palestine War : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (US President Joe Biden) इस्रायल दौऱ्यावर (Israel Visit) जाणार आहेत. इस्रायल-हमास युद्धाला 10 दिवस उलटून गेले आहेत. इस्रायलवर हमासचे रॉकेट हल्ले सुरूच आहेत. तर, दुसरीकडे गाझामध्ये इस्रायलकडून बॉम्बहल्ले थांबवण्याचं चिन्ह दिसत नाही. आतापर्यंत इस्रायलकडून गाझातील हमासच्या ठिकाणांवर हवाई आणि समुद्री मार्गाने रॉकेट आणि बॉम्बहल्ले करण्यात येत आहेत. पण, आता इस्रायली सैनिक गाझामध्ये घुसून हमासच्या हदशतवाद्यांना लक्ष करणार आहेत. 


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन इस्रायलला भेट देणार


इस्रायल-हमास युद्धाच्या तणावपूर्ण स्थितीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन इस्रायलला भेट देणार आहेत. जो बायडन बुधवारी इस्रायल दौरा करणार आहेत. बायडन मध्यपूर्व देशांचा दौरा करणार आहे. या दरम्यान ते जॉर्डन आणि इजिप्त देशांनाही भेट देणार आहेत. इस्रायलकडून गाझा पट्टीला लक्ष्य करण्यात येत आहे. गाझाच्या सीमेवर हजारो इस्रायल सैनिक तैनात करण्यात आले आहेत. इस्रायल लष्कर गाझातून हमासचा समूळ नायनाट करण्यासाठी जमिनीवरून युद्ध पुकारणार आहे.


अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी व्यक्त केली चिंता


उत्तर गाझामधील नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी इस्रायल-हमास युद्ध पाच तास थांबवण्यात आलं होतं. पाच तासांचा युद्धविराम लागू करण्यात आला होता. इस्रायलच्या हल्ल्यांमुळे गाझामध्ये हजारो लोक अडकले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी रविवारी या प्रकरणावर चिंता व्यक्त करत म्हटलं की, 'सामान्य पॅलेस्टिनी नागरिकांना पूर्णपणे जगण्याचा अधिकार आहे. इस्रायलच्या हल्ल्यांमुळे सर्वसामान्यांचे कोणतंही नुकसान होऊ नये.'


 


इस्रायल-हमास युद्धाचा 11 वा दिवस


गाझामधील पॅलेस्टिनींनी बचावासाठी उत्तरेकडे पलायन करण्याचं आवाहन केल्यानंतर इस्रायलने दक्षिण गाझा पट्टीवर बॉम्बफेक करणं सुरूच ठेवलं आहे. इस्रायलच्या हल्ल्यात 2800 हून अधिक पॅलेस्टिनी मारले गेले आहेत. एपीच्या वृत्तानुसार, गाझामध्ये मानवतावादी संकट निर्माण झालं आहे. पाणी, वीज आणि औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. हजारो पॅलेस्टिनींवर अन्न-पाण्याविना उपासमारीची वेळ आली आहे. तर, इस्रायलने गेल्या आठवड्यात हमासवर हल्ला केला, याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने हवाई हल्ले करत युद्ध पुकारलं.


तेल अवीव आणि जेरुसलेमवर रॉकेट हल्ले


हमासकडून इस्रायलवर रॉकेट हल्ले सुरुच आहेत. बीबीसीच्या वृत्तानुसार, आज इस्रायलच्या तेल अवीव आणि जेरुसलेमवर रॉकेटने हल्ला करण्यात आला आहे. तेल अवीव आणि जेरुसलेमवरील ताज्या रॉकेट हल्ल्यांची जबाबदारी पॅलेस्टिनी अतिरेकी गट हमासने स्वीकारली आहे. दरम्यान, आतापर्यंत इस्रायल-हमास हल्ल्यात 4200 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये इस्रायली नागरिक, पॅलेस्टिनी आणि इतर परदेशी नागरिकांचाही समावेश आहे.


महत्वाच्या इतर बातम्या : 


Israel-Gaza Conflict : गर्व आहे! इस्रायल-हमास युद्धात भारतीय बनला देवदूत, युद्धाच्या काळात शेकडो सैनिकांचं पोट भरतोय