Israel-Palestine Conflict : इस्रायल (Israel) आणि हमास (Hamas) यांच्यातील तणाव वाढत असून घनघोर युद्ध सुरू आहे. हमास आणि इस्रायल यांच्या युद्धाचा आज दहावा दिवस आहे. 7 ऑक्टोबर रोजी पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासने इस्रायलवर हल्ला केला. हमासने इस्रायलवर अचानक हल्ला केल्याने जगभरात खळबळ उडाली. हमासने केलेला हा हल्ला वर्षांतील सर्वात मोठा हल्ला आहे. हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलनेही गाझा पट्टीला लक्ष्य करत बॉम्बहल्ले केले. या युद्धात आतापर्यंत 4000 हून अधिक पॅलेस्टिनी आणि इस्रायली यांचा मृत्यू झाला आहे. या युद्धाच्या काळात एक भारतीय हा जगभरात चर्चेचा विषय आहे.
'हा' भारतीय युद्धाच्या काळात शेकडो सैनिकांचं पोट भरतोय
आता इस्त्रायली सैन्य गाझा पट्टीत घुसलं आहे. इस्रायली लष्कर गाझाचं अस्तित्व पुसून टाकण्यासाठी भू युद्ध पुकारण्यासाठी सज्ज झालं आहे. इस्रायली सैनिक गाझाला लक्ष्य करत आहेत. गाझामध्ये मोठ्या प्रमाणावर इस्रायली सैन्य दाखल झालं आहे. पण, यादरम्यान एक भारतीय इस्रायल गाझा सीमेवर गेल्या 10 वर्षांपासून राहत आहे. अशी कुटुंबे या परिसरात जास्त आहेत. हा भारतीय शेकडो इस्रायली सैनिकांना स्वयंपाक करून खाऊ घालतो.
'आम्हाला शांतता हवीय'
इस्रायलच्या उत्तरेकडील गाझा सीमेजवळ राहणाऱ्या एका भारतीयाने सांगितलं की, 'मी येथे 10 वर्षांपासून राहत आहे. माझे घर, कुटुंब, व्यवसाय येथेच आहेत. युद्धादरम्यान येथे भीतीचं वातावरण आहे. इतर कुटुंबंही येथे राहतात. आम्ही इस्रायली सैन्यासाठी भारतीय शाकाहारी जेवण तयार करतो. आम्ही स्वतःसाठी काहीतरी नाव कमावले आहे आणि इस्रायली सैन्यासोबत उभे आहोत. आम्हालाही शांतता हवी आहे आणि परिस्थिती लवकरात लवकर परत यावी अशी आमची इच्छा आहे.
इस्रायली सैनिकांच्या जेवणात 'या' पदार्थांचा समावेश
या भारतीय व्यक्तीने सांगितलं की, 'आम्ही दहा वर्षांपासून येथे राहत आहोत. आता युद्ध सुरू आहे, आम्ही दररोज 100 ते 150 लोकांसाठी भारतीय अन्न शिजवतो आणि ते इस्रायली सैनिकांना पाठवतो. यामध्ये आम्ही इस्रायली सैनिकांसाठी संपूर्ण खाळी तयार करून त्यांना खाऊ घालतो. यामध्ये डाळी, भात, मिक्स भाज्या, बटाटा करी यांचा समावेश आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे इस्त्रायली वीगन सैनिकही आपले भारतीय पदार्थ खाऊ शकतात.'
Operation Ajay : भारतीयांना सुखरुप आणण्यासाठी भारताचं
इस्रायलच्या आणि हमासच्या युद्धामध्ये अनेक निष्पापांचे बळी जात आहेत. तर अनेक जण पोरके होत आहेत. या युद्धाची विद्रोहकता इतकी तीव्र होत चालली आहे, की यामध्ये अनेकांनी प्राण गमावले तर घर, कुटुंबही गमावलं आहे. इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांना मयादेशी परत आणण्यासाठी भारताकडून ऑपरेशन अजय देखील सुरु करण्यात आले आहे.