Israel Hamas Attack Update : इस्रायल-हमास युद्ध (Israel Palestine War) सुरुच आहे. 7 ऑक्टोबरला हमासने इस्रायलवर 5000 क्षेपणास्र डागत हल्ला केला. यानंतर इस्रायलनेही गाझावर हल्ला चढवत युद्धाचं रणशिंग फुंकलं. आजही हमासकडून इस्रायलवर रॉकेट हल्ला केला आहे. हमासने तेल अवीववर क्षेपणास्त्र डागली. तर इस्रायल सैन्य गाझाच्या सीमेवर तैनात असून हल्ल्याच्या तयारीत आहे. इस्रायल-हमासमध्ये सध्याची परिस्थिती काय आहे. आताच्या घडीच्या टॉप 10 घडामोडी 'एबीपी माझा'च्या ग्राऊंड रिपोर्टमधून जाणून घ्या.
इस्रायल-हमास युद्धात काय-काय घडत आहे?
1. दहशतवादी गटाने दावा केला आहे की, गाझामध्ये हमासच्या इतर गटांकडे आणखी 50 नागरिक ओलीस ठेवण्यात आले आहेत. हमासने ओलीस ठेवलेल्या नागरिकांचा पहिला व्हिडीओ जारी केली आहे.
2. हमास या पॅलेस्टिनी दहशतवादी गटाने पहिली क्लिप जारी केली आहे, ज्यामध्ये गाझा पट्टीमध्ये दहशतवादी गटांनी 200 हून अधिक इस्रायली ओलीस ठेवल्याचं दिसत आहेत. एका तरुण महिलेच्या हाताला दुखापत झाल्यानंतर तिच्यावर उपचार केले गेलेत. नंतर ती जखमी महिला बोलत असल्याचे या छोट्या व्हिडीओमध्ये दिसत आहे. महिलेने तिचे नाव आणि 7 ऑक्टोबर रोजी पॅलेस्टिनी दहशतवाद्यांनी पकडले, तेव्हा ती कुठे होती, याची माहिती दिली आहे.
3. जीवनावश्यक वस्तंनी भरलेले 100 हून अधिक ट्रक सध्या रफाह सीमा ओलांडण्यासाठी इजिप्शियन बाजूला उभे आहेत. गाझामध्ये प्रवेश मिळण्याची वाट पाहत आहेत. रफाह सीमा पुन्हा उघडल्याबद्दल अनेक बातम्या खोट्या असल्याचे सिद्ध झालं आहे.
4. इस्रायलने युनायटेड स्टेट्सकडे आपत्कालीन लष्करी मदतीसाठी 10 अब्ज डॉलर्सची मागणी केली आहे. न्यूयॉर्क टाइम्सने तीन अधिकार्यांचा हवाला देत ही बातमी दिली आहे.
5. कतारची मधस्थी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. हमासच्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान गाझामध्ये सध्या बंदिस्त असलेल्या महिला, मुले आणि वृद्ध ओलीसांची सुटका करण्यासाठी कतार हमाससोबत मध्यस्ती करत आहे. अंदाजे 150 ते 200 इस्रायली आणि परदेशी नागरिक हमासच्या ताब्यात आहेत.
6. इस्रायल-हमास संघर्षात युद्धविराम आणि शांतता चर्चेसाठी दबाव आणण्यासाठी चीनचे राजदूत झाई जून या येत्या आठवड्यात मध्य पूर्व देशांना भेट देतील. सीसीटीव्हीने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे की, ''झाई पुढील आठवड्यात युद्धविरामासाठी विविध पक्षांशी समन्वय साधण्यासाठी, नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी, परिस्थिती सुलभ करण्यासाठी आणि शांतता चर्चेला प्रोत्साहन देण्यासाठी मध्य पूर्वेला भेट देतील.''
7. इस्रायलने गाझा मोहीम थांबवली नाही तर, त्याचे दूरगामी परिणाम भोगावे लागतील, असा इशारा इराणने दिला आहे. इराणच्या यूएन मधील मिशनने धमकी दिली आहे की, इस्रायलने गाझावर हल्ला सुरू ठेवल्यास इस्रायल आणि हमासमधील संघर्ष वाढू शकतो. ज्यात दहशतवादी गट हिजबुल्ला स्वतः सहभागी होईल, ही एक धमकी मानली जात आहे. इराणने इस्रायलवर ''युद्ध आणि नरसंहार'' केल्याचा आरोप केला आहे. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ शकते आणि त्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात. याचा दोष UN सुरक्षा परिषदेवर ठेवला जातो, असं इराणने जाहिर केलं आहे.
8. हमास दहशतवादी गटाचे मान्य केले आहे की, लेबनॉनमधील त्यांचे सदस्य आयडीएफने इस्रायलच्या सीमेवरील हल्ल्यात घुसखोरीचा प्रयत्न करताना ठार झाले आहेत. इस्रायली सैन्याने हवाई दलाच्या विमानांनी सीमा ओलांडून इस्रायली लक्ष्यांवर टँकविरोधी क्षेपणास्त्रे डागण्याची योजना आखल्याचा संशय असलेल्या लोकांच्या गटावर हल्ला केला.
9. गाझामधील नागरिकांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. एपीच्या वृत्तानुसार, गाझामधील रुग्णालयांना सोमवारी, पाणी, वीज आणि औषध संपले आहेत.
10. हमासकडून इस्रायलवर रॉकेट हल्ले सुरुच आहेत. बीबीसीच्या वृत्तानुसार, आज इस्रायलच्या तेल अवीव आणि जेरुसलेमवर रॉकेटने हल्ला करण्यात आला आहे. तेल अवीव आणि जेरुसलेमवरील रॉकेट हल्ल्यांची जबाबदारी पॅलेस्टिनी अतिरेकी गट हमासने स्वीकारली आहे.