Israel-Hamas War Live Updates : इस्रायल-हमास संघर्षात 4000 हून अधिक मृत्यू, युद्धाचा 11 वा दिवस, संघर्ष सुरुच
Israel Palestine War : इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्या 7 ऑक्टोबरला युद्धाला सुरुवात झाली असून संघर्ष कायम आहे. आतापर्यंत 3000 लोकांचा मृत्यू झाला आहे.
गाझामधील नागरिकांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. एपीच्या वृत्तानुसार, गाझामधील रुग्णालयांना सोमवारी, पाणी, वीज आणि औषध संपले आहेत. हजारो पॅलेस्टिनींनी अन्नाच्या शोधात आहेत. गेल्या आठवड्यात हमासने इस्रायलवर हल्ला केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने करत गाझा पट्टीवर आक्रमण सुरू केलं.
हमास या दहशतवादी गटाने पहिली क्लिप जारी केली आहे, ज्यामध्ये गाझा पट्टीमध्ये दहशतवादी गटांनी 200 किंवा त्याहून अधिक इस्रायली ओलीस ठेवल्याने दिसत आहेत. एका तरुण महिलेच्या हाताला दुखापत झाल्यानंतर तिच्यावर उपचार केले गेलेत. नंतर ती जखमी महिला बोलत असल्याचे या छोट्या व्हिडीओमध्ये दिसत आहे.
इस्रायलच्या सैन्याने दिलेल्या माहितीनुसार, हमासने 199 लोकांना ओलीस ठेवलं आहे. गेल्या आठवड्यात इस्रायली लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की, हमास दिलेल्या सुमारे 150 नागरिक ओलिस आहेत. आता हा आकडा वाढल्याचं समोर आलं आहे.
हमासकडून इस्रायलवर रॉकेट हल्ले सुरुच आहेत. बीबीसीच्या वृत्तानुसार, आज इस्रायलच्या तेल अवीव आणि जेरुसलेमवर रॉकेटने हल्ला करण्यात आला आहे. तेल अवीव आणि जेरुसलेमवरील आज झालेल्या रॉकेट हल्ल्यांची जबाबदारी पॅलेस्टिनी अतिरेकी गट हमासने स्वीकारली आहे.
Israel Palestine War : इस्रायल लष्कर (IDF) सध्या लेबनॉनमधील हिजबुल्लाह दहशतवादी लक्ष्यांवर हल्ला करत आहे. याबाबत इस्रायल सैन्याने सोशल मीडिया पोस्टद्वारे माहिती दिली आहे.
इस्रायलच्या हवाई दलाने हमासच्या गुप्तचर विभागाच्या प्रमुखाची हत्या केल्याचा दावा केला आहे. इस्रायली वायुसेनेने ट्विटर X वर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओतून गाझा पट्टीच्या खान युनूसमध्ये हवाई हल्ल्यात हमासचा अतिरेकी मारला गेल्याचे सांगण्यात येत आहे.
पार्श्वभूमी
Israel Hamas Conflict : इस्रायल आणि पॅलेस्टिनी यांच्यात युद्ध सुरु आहे. पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होताना दिसत आहे. या संघर्षात आतापर्यंत 3000 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये पॅलेस्टिनी आणि इस्रायली नागरिकांसह विदेशी नागरिकांचाही समावेश आहे. शनिवारी, 7 ऑक्टोबरला हमासने इस्रायलला लक्ष्य करत विविध शहरांवर हवाई, समुद्री आणि जमिनीवरून हल्ले करत युद्धाला सुरुवात केली. हमासने इस्रायलवर सुमारे 5000 हून अधिक रॉकेट डागले आहेत. इस्रायल लष्कराकडूनही हमासवर प्रतिहल्ले सुरु आहेत. इस्रायलकडून गाझातील हमासच्या ठिकाणांना लक्ष्य करुन त्यांचे तळ उदध्वस्त करण्यात येत आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -