एक्स्प्लोर

युद्धखोर इस्त्रायलचा पहिल्याच दिवशी युद्धविरामाला सुरुंग, लेबनाॅनमध्ये 10 मिनिटात 254 जणांच्या कत्तली; अमेरिकेनं सुद्धा पलटी मारली; संतप्त इराणनं होर्मुझ मार्ग पुन्हा रोखला, उद्यापासून चर्चा होणार तरी कशी?

लेबनॉनमध्ये युद्धखोर इस्रायली हल्ल्यांमध्ये एकाच दिवसात 254 लोकांचा मृत्यू झाला असून, 1165 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. यानंतर देशात राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

Iran War Live Update: भयावह उर्जा संकटाच्या टांगत्या तलवारीमुळे दोन आठवड्यांच्या युद्धविरामानंतर अवघ्या जगाला दिलासा मिळाला असतानाच युद्धखोर इस्त्रायली पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांच्या नरसंहाराने पुन्हा धोका निर्माण झाला आहे. दुसरीकडे, इस्त्रायलने युद्धबंदीत लेबनॉनमध्ये 10 मिनिटात 254 जणांची कत्तल केली. लेबनॉनमध्ये युद्धखोर इस्रायली हल्ल्यांमध्ये एकाच दिवसात 254 लोकांचा मृत्यू झाला असून, 1165 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. यानंतर देशात राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

युद्धविराम की इस्रायलमार्फत युद्ध सुरू ठेवायचे?

लेबनॉनचे पंतप्रधान नवाफ सलाम यांनी सांगितले की, इस्रायलचे हल्ले थांबवण्यासाठी ते सर्व राजकीय आणि राजनैतिक संसाधने एकत्रित करत आहेत. आरोग्य मंत्री रकान नसरेद्दीन यांनी आंतरराष्ट्रीय मदतीचे आवाहन केले आहे. मोठ्या संख्येने जखमी झालेल्यांच्या उपचारांमुळे आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण येत आहे. दरम्यान, युद्धविरामावरून वाद अधिकच वाढला आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांनी सांगितले की, लेबनॉन या कराराचा भाग नाही. अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स म्हणाले, "आम्ही असे कोणतेही वचन दिले नव्हते."दरम्यान, इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची म्हणाले की, अमेरिकेने युद्धविराम लागू करायचा की इस्रायलमार्फत युद्ध सुरू ठेवायचे, याचा निर्णय घेतला पाहिजे, कारण दोन्ही गोष्टी एकत्र नांदू शकत नाहीत. दरम्यान, अमेरिकेनं पहिल्या 24 तासांमध्येच 10 पैकी 3 अटींचे उल्लंघन केल्याचे इराणी संसद अध्यक्ष मोहम्मद गालिबाफ यांनी म्हटलं आहे. 

युद्धविरामानंतर मागील 24 तासात काय घडलं?

  • होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ 426 तेलवाहू जहाजे आणि 53 गॅसवाहू जहाजांसह शेकडो जहाजे अडकली आहेत.
  • युद्धविरामानंतरच्या पहिल्या हल्ल्यात लेबनॉनच्या हिजबुल्लाहने इस्रायलवर रॉकेट डागले.
  • वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तानुसार, मध्य पूर्वेतील अधिकाऱ्यांनी अमेरिका-इराण युद्ध अधिक तीव्रतेने पुन्हा भडकण्याची शक्यता वर्तवली आहे.
  • होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये मोठ्या संख्येने जहाजे अडकली आहेत.
  • रॉयटर्सच्या वृत्तानुसार, अमेरिका-इराण युद्धविराम "डळमळीत" आणि "संशयास्पद"
  • अमेरिकेचे उपराष्ट्रपती व्हान्स म्हणाले की, इराणसोबतच्या युद्धविराम करारामध्ये लेबनॉनचा समावेश नाही.
  • वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तानुसार, इराण युद्धाला पाठिंबा देण्यास नकार देणाऱ्या नाटो देशांमधून अमेरिकी सैन्य मागे घेण्याच्या योजनेवर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प विचार करत आहेत.
  • इराणचे म्हणणे आहे की, लेबनॉन युद्धविरामाचा भाग नाही हा अमेरिकेचा दावा करार मोडण्याचे एक निमित्त आहे.
  • राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना त्यांच्या पुढील दौऱ्यात "इस्रायल शांतता पुरस्कार" देण्याचा इस्रायल विचार करत आहे.
  • सीएनएनच्या वृत्तानुसार, अमेरिका-इराण युद्धविराम हा औपचारिक लेखी करार असल्याचे दिसत नाही.
  • अमेरिकेचे उपराष्ट्रपती व्हान्स यांनी इशारा दिला आहे की, शस्त्रसंधी करार मोडल्यास इराणला "गंभीर परिणामांना" सामोरे जावे लागेल.
  • स्पेनचे पंतप्रधान पेद्रो सांचेझ म्हणाले, "शस्त्रसंधीमध्ये लेबनॉनचा समावेश असलाच पाहिजे."
  • स्पेनचे पंतप्रधान पेद्रो सांचेझ यांनी युरोपियन युनियनला "इस्रायलसोबतचा आपला संलग्नता करार स्थगित" करण्याचे आवाहन केले आहे.
  • "या गुन्हेगारी कृत्यांसाठी कोणतीही सूट मिळता कामा नये."
  • इराणच्या संसदेचे अध्यक्ष म्हणाले की, अमेरिका आणि इस्रायलने शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन केले आहे. "अशा परिस्थितीत, द्विपक्षीय शस्त्रसंधी किंवा वाटाघाटी करणे अवास्तव आहे."
  • इराणचे परराष्ट्र मंत्री अराघची यांनी लेबनॉनवरील इस्रायली हल्ल्यांवर प्रतिक्रिया दिली. "इराण-अमेरिका शस्त्रसंधीच्या अटी स्पष्ट आणि सुस्पष्ट आहेत. अमेरिकेला निवड करावी लागेल, शस्त्रसंधी किंवा इस्रायलमार्फत युद्ध सुरू ठेवणे. त्यांना दोन्ही मिळू शकत नाहीत. लेबनॉनमधील हत्याकांड जग पाहत आहे. चेंडू आता अमेरिकेच्या कोर्टात आहे, आणि ते आपल्या वचनबद्धतेनुसार कृती करतील की नाही याकडे जग पाहत आहे."
  • अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स आणि स्टीव्ह विटकॉफ या आठवड्याच्या अखेरीस इराणसोबत चर्चा करण्यासाठी पाकिस्तानला भेट देणार आहेत.
  • इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू म्हणतात की, इराणचे संवर्धित युरेनियम 'कराराने किंवा युद्धाने' हटवले जाईल.
  • पंतप्रधान नेतान्याहू म्हणतात की, ही लढाईची अखेर नाही आणि इस्रायल आपली उद्दिष्ट्ये साध्य करण्याच्या मार्गावर आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Hemant Nimbalkar : बेंगळुरुतील जीवघेणी वाहतूक कोंडी सुटणार अन् गुन्ह्यांवरही नियंत्रण येणार; 'आयटी हब'च्या सुरक्षेची जबाबदारी मराठमोठ्या IPS अधिकाऱ्यावर
बेंगळुरुतील जीवघेणी वाहतूक कोंडी सुटणार अन् गुन्ह्यांवरही नियंत्रण येणार; 'आयटी हब'च्या सुरक्षेची जबाबदारी मराठमोठ्या IPS अधिकाऱ्यावर
Land Deal Cash Limit : जमीन व्यवहारातील काळ्या पैशाला बसणार चाप! 2 लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
जमीन व्यवहारातील काळ्या पैशाला बसणार चाप! 2 लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
राहुल गांधींचे लोकसभा सदस्यत्व 24 तासात रद्द केले, सुनील केदारांवर तातडीनं कारवाई, महेश बालदींबाबत विधानसभा अध्यक्षांची निष्क्रियता स्पष्ट दिसते : हर्षवर्धन सपकाळ
कायदा विरोधकांसाठी तातडीने आणि सत्ताधाऱ्यांसाठी सोयीने, हा भाजपचा दुटप्पीपणा: हर्षवर्धन सपकाळ
आर्ची परश्याच्या गाजलेल्या दृश्याची साक्षीदार, सैराट चित्रपटातील विहीर पडली कोरडी, 61 वर्षांनंतर दुष्काळाचे भीषण वास्तव
आर्ची परश्याच्या गाजलेल्या दृश्याची साक्षीदार, सैराट चित्रपटातील विहीर पडली कोरडी, 61 वर्षांनंतर दुष्काळाचे भीषण वास्तव

व्हिडीओ

Sanjay Raut PC Mumbai : इंदू मिल स्मारकाची किंमत का वाढतेय याचा सरकारने खुलासा करावा
Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी
Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report
Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hemant Nimbalkar : बेंगळुरुतील जीवघेणी वाहतूक कोंडी सुटणार अन् गुन्ह्यांवरही नियंत्रण येणार; 'आयटी हब'च्या सुरक्षेची जबाबदारी मराठमोठ्या IPS अधिकाऱ्यावर
बेंगळुरुतील जीवघेणी वाहतूक कोंडी सुटणार अन् गुन्ह्यांवरही नियंत्रण येणार; 'आयटी हब'च्या सुरक्षेची जबाबदारी मराठमोठ्या IPS अधिकाऱ्यावर
Land Deal Cash Limit : जमीन व्यवहारातील काळ्या पैशाला बसणार चाप! 2 लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
जमीन व्यवहारातील काळ्या पैशाला बसणार चाप! 2 लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
राहुल गांधींचे लोकसभा सदस्यत्व 24 तासात रद्द केले, सुनील केदारांवर तातडीनं कारवाई, महेश बालदींबाबत विधानसभा अध्यक्षांची निष्क्रियता स्पष्ट दिसते : हर्षवर्धन सपकाळ
कायदा विरोधकांसाठी तातडीने आणि सत्ताधाऱ्यांसाठी सोयीने, हा भाजपचा दुटप्पीपणा: हर्षवर्धन सपकाळ
आर्ची परश्याच्या गाजलेल्या दृश्याची साक्षीदार, सैराट चित्रपटातील विहीर पडली कोरडी, 61 वर्षांनंतर दुष्काळाचे भीषण वास्तव
आर्ची परश्याच्या गाजलेल्या दृश्याची साक्षीदार, सैराट चित्रपटातील विहीर पडली कोरडी, 61 वर्षांनंतर दुष्काळाचे भीषण वास्तव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 नोव्हेंबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 नोव्हेंबर 2026 | शुक्रवार
FDA Guidelines Health Supplements :  जीममध्ये जाणाऱ्या तरुणांनो-सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सनो सावधान! हेल्थ सप्लिमेंट्स अन् प्रोटीन पावडरवर FDAचा मोठा चाप; दिशाभूल केल्यास 10 लाखांचा दंड
जीममध्ये जाणाऱ्या तरुणांनो-सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सनो सावधान! हेल्थ सप्लिमेंट्स अन् प्रोटीन पावडरवर FDAचा मोठा चाप; दिशाभूल केल्यास 10 लाखांचा दंड
Mohammed Siraj: सिराजला डावलल्यानं माजी क्रिकेटपटू भडकले, टीम इंडियाच्या वादात काँग्रेस खासदाराची उडी, नेमकं काय म्हणाले?  
सिराज नावामुळं त्याला संघात स्थान मिळत नाही, काँग्रेस खासदाराची टीम इंडियाच्या संघ निवडीच्या वादात उडी
Gondia Crime News : 13 लाखांची सुपारी दिली; पतीच्या मैत्रिणीला संपवलं, अडीच वर्षांची चिमुकली आईच्या मायेपासून झाली पोरकी, पुण्यातील एअर हॉस्टेसला कसं संपवलं, हादरवणारी माहिती समोर
13 लाखांची सुपारी दिली; पतीच्या मैत्रिणीला संपवलं, अडीच वर्षांची चिमुकली आईच्या मायेपासून झाली पोरकी, पुण्यातील एअर हॉस्टेसला कसं संपवलं, हादरवणारी माहिती समोर
Embed widget