टॉप कमांडर आपल्या ताफ्यासह बगदादी विमानतळावर जात असताना अमेरिकेने रॉकेट हल्ला केला. या हल्ल्यात पॉप्युलर मोबलाइजेशन फोर्सचे डेप्युटी कमांडर अबू मेहदी अल मुहांदिस यांचा मृत्यू झाल्याचीही माहिती मिळत आहे. इराक प्रशासनाने टॉप कमांडर जनरल कासिम सोलेमानी यांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दरम्यान, सुलेमानी यांच्यावर इजराईलमध्ये रॉकेट हल्ला केल्याचा आरोप होता. अमेरिका बऱ्याच काळापासून सुलेमानी यांच्या शोधात होती.
हाती आलेल्या माहितीनुसार, बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर 3 जानेवारी रोजी रॉकेट हल्ला झाला आहे. तीन रॉकेटचा हल्ला करण्यात आल्याने या ठिकाणी वाहनांना आग लागली. यामध्ये काही टॉप कमांडरचा मृत्यू झाला असून अनेक सैनिक जखमी झाले आहेत. टॉप कमांडर जनरल कासिम सोलेमानी यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. बगदादमध्ये अमेरिकेच्या दूतावासावर इराण समर्थक मिलिशियाकडून नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला हल्ला करण्यात आला होता. अमेरिकेसोबत तणाव निर्माण झाल्यानंतर हा हल्ला करण्यात आला होता.
संबंधित बातम्या :
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोग संमत, सीनेटमध्ये पुढील महिन्यात मतदान
पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांना मृत्युदंडाची शिक्षा