नवी दिल्ली : पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांकांवर हल्ल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. गुरुद्वारावर झालेल्या हल्ल्यानंतर आता पेशावर मध्ये एका शिख तरुणाची अज्ञातांकडून हत्या करण्यात आली आहे. परविंदर सिंग असं मृत तरुणाचं नाव आहे. तो मलेशियात राहायचा अवघ्या एका महिन्यासाठी परविंदर पाकिस्तानात आला होता.

शीख युवकाच्या हत्येबद्दल भारताने पाकिस्तानचा निषेध केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, पेशावरमध्ये अल्पसंख्याकांनी शीख समुदायाच्या सदस्याच्या हत्येचा तीव्र निषेध केला. तसेच मंत्रालयाने पाकिस्तान सरकारला असे उपक्रम त्वरित थांबवावेत आणि दोषींवर कडक करावी असा सल्ला दिला आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, पाकिस्तानने देशातील अल्पसंख्याकांच्या सुरक्षेविषयी इतर देशांना उपदेश करण्याऐवजी आपल्या देशातील नागरिकांच्या संरक्षणासाठी काम केले पाहिजे.

शुक्रवारी ( 3 जानेवारी) एका हिंसक जमावाने गुरुद्वारा ननकाना साहिबवर हल्ला केला. या वेळी दगडफेकही करण्यात आली होती. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी कारवाई केली. यासंदर्भात भारत सरकारने पाकिस्तानला कडक कारवाई करण्याची विनंती केली आहे. शनिवारी (4 जानेवारी) भारतातील अनेक संघटना आणि पक्षांच्या नेत्यांनी ऐतिहासिक गुरुद्वारावरील जमावाने केलेल्या हल्ल्याचा निषेध केला आणि त्याला 'भ्याडपणा' आणि 'लज्जास्पद' कृत्य म्हटले आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी या घटनेवरील मौन तोडले. इम्रान खान म्हणाले, 'ही घटना माझ्या विचारसरणीच्या विरोधात आहे. पोलिस आणि न्यायव्यवस्थेसह सरकारकडून याबाबत कडक कारवाई करण्यात येणार आहे. गुरुद्वारा ननकाना साहिब लाहोरजवळ असून त्याला गुरुद्वारा जन्मस्थान म्हणून देखील ओळखले जाते. हे शीखांचे पहिले गुरु नानक देव यांचे जन्मस्थान आहे.

Balasaheb Thorat | थेट मुख्यमंत्र्यांना दोष देणं चुकीचं : बाळासाहेब थोरात | ABP Majha



पाकिस्तानात गुरुद्वारावर झालेल्या हल्ल्याचा उमर खालिद ने निषेध केला आहे. खालिद म्हणाला, पाकिस्तानातल्या हल्लेखोर मुसलमानांना मी मुसलमान नाही मानत कारण त्यांनी गुरुद्वारावर हल्ला केला आहे. त्याचबरोबर आम्ही सीएए विरोधात कसं लढायचं हे पाकिस्तानने सांगण्याची गरज नाही असं म्हणत उमरने इम्रान खानवरही निशाणा साधला आहे.