बगदाद : अमेरिका आणि इराण यांच्यात दिवसेंदिवस तणाव निर्माण होताना दिसत आहे. इराकची राजधानी बगदादमध्ये अमेरिकेने शुक्रवारी सकाळी ड्रोनद्वारे क्षेपणास्त्र हल्ला केला होता. त्याच्या दुसऱ्याच दिवशी बगदादमधील अमेरिकी दुतावास आणि सैन्य ठिकाणांवर काल रात्री दोन क्षेपणास्त्राने हल्ला झाला आहे. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणकडून बदला घेणार असल्याचं बोललं गेलं होतं. अजूनही या हल्ल्याची जबाबदारी कोणी घेतलेली नाही. मात्र, या हल्ल्यामुळे अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धाची थिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


इराकची राजधानी बगदादमधील अमेरिकी दूतावासावर क्षेपणास्त्राने हल्ला करण्यात आला. पहिल्यांदा मॉर्टरने हल्ला झाला त्यानंतर दोन क्षेपणास्त्र डागण्यात आली. बगदादमधील ग्रीन झोनमध्ये असणाऱ्या अमेरिकेच्या दूतावासाच्या आतमध्ये क्षेपणास्त्र डागण्यात आले. तर, इराकच्या मध्यवर्ती भागातील बलाद हवाईतळावरही दोन क्षेपणास्त्रांनी मारा करण्यात आला आहे. अमेरिकेच्या सैन्य तळांवर कत्यूषा क्षेपणास्त्राने हल्ला केल्याची माहिती इराकच्या सैन्याने दिली आहे. या क्षेपणास्त्राचा वापर सोव्हिएत संघाने दुसऱ्या महायुद्धात केला होता. अमेरिकेने केलेल्या इराणवर केलेल्या हल्ल्याचा परिणाम म्हणून इराकमधील घटनेकडे पाहिले जात आहे.

इराणकडून बदला?
अमेरिकेने गुरुवारी रात्री इराकची राजधानी बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर रॉकेट हल्ला केला आहे. या हल्ल्यात टॉप कमांडर जनरल कासिम सुलेमानी यांचा मृत्यू झाला होता. त्याच्या दुसऱ्याच दिवशी शनिवारी रात्री उशिरा इराणने प्रतिहल्ला चढवला असून बगदादमधील अमेरिकी दुतावास व अमेरिकेच्या सैन्य ठिकाणांना लक्ष्य केलं. त्यामुळे इराणने बदला घेतल्याचे बोलले जात आहे. कारण, जनरल कासिम सुलेमानी याच्या मृत्यूनंतर त्याची मुलगी आणि राष्ट्रपती हसन रोहानी यांची चर्चा समजून घ्यावी लागेल. ज्यावेळी माझ्या वडिलांच्या मित्रांचं रक्त सांडायचं त्यावेळी ते बदला घेत होते. आता माझ्या वडिलांचच रक्त सांडलय, त्याचा बदला कोण घेणार? यावर उत्तरात राष्ट्रपती रोहानी म्हणाले होते. याचा बदला नक्की घेणार, शहीदाच्या हत्येचा बदला नक्की घेतला जाईल, चिंता करू नको.

अमेरिकेचा इराणवर हल्ला -
टॉप कमांडर जनरल कासिम सुलेमानी आपल्या ताफ्यासह बगदादी विमानतळावर जात असताना अमेरिकेने रॉकेट हल्ला केला. या हल्ल्यात पॉप्‍युलर मोबलाइजेशन फोर्सचे डेप्युटी कमांडर अबू मेहदी अल मुहांदिस यांचा मृत्यू झाल्याचीही माहिती मिळत आहे. इराक प्रशासनाने टॉप कमांडर जनरल कासिम सोलेमानी यांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दरम्यान, सुलेमानी यांच्यावर इस्त्राईलमध्ये रॉकेट हल्ला केल्याचा आरोप होता. अमेरिका बऱ्याच काळापासून सुलेमानी यांच्या शोधात होती. शुक्रवारी तीन जानेवारीला हा हल्ला झाला होता. तेव्हापासून इराण बदल्याची भाषा बोलत होता.

संबंधित बातमी : इराकमधल्या बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर रॉकेट हल्ला; 8 जणांचा मृत्यू

Modi meets Donald Trump | नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भेट, इराण, व्यापार, फाईव्ह जीसह अनेक मुद्द्यांवर चर्चा | ABP Majha