जीनेव्हा : मागील दोन वर्षात महामारीच्या काळात अनेक जणांच्या नोकऱ्या गेल्या, अनेक जण बेरोजगार झालेत असं काहीसं चित्र होतं. अशातच येणारं वर्ष देखील त्याच प्रकारचं असेल असं भाकीत आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेकडून (International Labour Organization) वर्तवण्यात आलंय. 2022 सालात जागतिक बेरोजगारीची संख्या 20.7 कोटी इतकी असेल असा अंदाज आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेनं आपल्या अहवालात नमूद केलंय. कोविड-19 महामारी सुरु होण्यापूर्वी 2019 सालच्या तुलनेत ही आकडेवारी 2 कोटी 10 लाखांनी अधिक असल्याचं देखील सांगण्यात येत आहे.
या वर्षाबद्दल देखील बोलायचं झालं तर 2022 सालात जागतिक कामकाजाचे तास 2019 सालच्या सरासरीपेक्षा 2 टक्क्यांनी कमी असण्याचा अंदाज संघटनेकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे 5 कोटी 20 लाख पूर्णवेळ नोकऱ्या गमावण्याइतकी ही संख्या असल्याचं सांगण्यात येत आहे. ही तूट आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेनं गेल्या वर्षी मे महिन्यात जारी केलेल्या अंदाजापेक्षाही दुप्पट आहे, जी एक गंभीर गोष्ट असल्याचं दिसतंय.
महत्त्वाचं म्हणजे यात एक महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवलं गेलंय. ज्यात सांगण्यात आलंय की कोविड-19 च्या नव्या व्हेरीयंटमुळे जगातील कामगारांवर आणि कामावर परिणाम झाला आहे.
सन 2022 मध्ये सुमारे 4 कोटी लोकं यापुढे कामगार क्षेत्राकडे वळणार नसल्याचं देखील भाकीत वर्तवण्यात आलंय. या अहवालात असंदेखील नमूद केलं गेलंय की, साथीच्या रोगामुळे सोबतच महामारीमुळे पुढील भविष्यातले मार्ग अनिश्चित आहेत. तसेच, आर्थिक प्रगतीसाठी महागाई वाढण्यासारख्या समस्यांना देखील तोंड द्यावे लागू शकते. अशात जगभरातील कामगारांच्या बाजारपेठेवर याचे अनिश्चितेचे ढग बघायला मिळतायत.
साथीच्या रोगानं लाखो मुलांना गरीबीकडे ढकलले आहे. दुसरीकडे, 2020 सालात साधारण 3 कोटी जणांना कामाबाहेर असताना अत्यंत गरिबीत हालाखीचे दिवस काढावे लागले आहे. प्रतिदिन 140 रुपयांहून कमी रोजंदारीवरया संख्येने 2020 सालात काम केल्याचं देखील नमूद करण्यात आलंय. अशातच कष्टकरी गरीबांच्या संख्येत देखील वाढ झाली आहे. जे कामगार स्वत:ला आणि त्यांच्या कुटुंबांना दारिद्रयरेषेच्या वर ठेवण्यासाठी त्यांच्या परीश्रमातून पुरेसे कमवू शकत नाहीत अशांची संख्या 80 लाखांनी वाढली आहे.
बऱ्याच अविकसित देशांमध्ये लस मिळवण्यासाठी दुसऱ्या देशांवर अवलंबून राहावे लागते आहे. अनेक संकटांचा सामना करण्यासाठीसरकारी बजेटची वानवा आहे. अशात ही सर्व अविकसित देश महामारीच्या पूर्वीच्या रोजगार आणि नोकरीच्या गुणवत्तेच्या पातळीवरपरतण्यासाठी संघर्ष करत आहेत.
आफ्रिका, अमेरिका, अरब प्रांत, आशिया, पॅसिफिक आणि युरोप आणि मध्य आशियातील सर्व प्रदेशांमधील प्रमुख कामगार बाजार अद्यापही साथी पूर्वच्या पातळीवर परतण्यास झगडत आहेत.
सर्व प्रदेश त्यांची श्रमिक बाजारपेठ उभी करण्यासाठी मोठे प्रयत्न करतायत. मात्र साथीच्या रोगाच्या सततच्या आडकाठीमुळे अनेक अडचणी येत असल्याचं दिसतंय. प्रामुख्याने बोलायचं तर दक्षिण आशियाई देश ज्यात भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेशसारखेदेश, लॅटीन अमेरिका आणि कॅरिबियन देशांचा समावेश आहे.
पर्यटन आणि वाहतुकीसारख्या क्षेत्रांना विशेष फटका बसला आहे. सोबतच इतर क्षेत्र जे की माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित आहेत अशांनादेखील मोठा फटका बसला.
पुरुषांपेक्षा महिलांना श्रमिक बाजाराच्या संकटाचा अधिक फटका बसलाय आणि पुढे देखील असं चित्र राहणार असल्याचं भाकीतवर्तवण्यात आलंय. दुसरीकडे, शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था बंद झाल्यानं तरुणांना वेगळेच परिणाम भोगावे लागतील. तसेच इंटरनेट प्रवेश नसलेल्यांवर देखील दीर्घकालीन परिणाम होतील असं देखील सांगण्यात येत आहे. महामारीच्या सुरुवातीला तात्पुरता नोकऱ्यागमावलेल्या कामगारांना पुन्हा एकदा तात्पुरता नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत.
श्रमिकांची बाजारपेठ उभी करताना ती प्रामुख्याने मानव केंद्रीत, सर्वसमावेशक आणि टिकाऊ गोष्टींवर उभी करण्याची गरज असल्याचंदेखील अहवालात नमूद केलं गेलंय.
महत्त्वाच्या बातम्या :
- International Flights : वाढत्या कोरोना रुग्णांची धास्ती, नियोजित आंतरराष्ट्रीय उड्डाणे पुन्हा लांबणीवर
- ब्रिटनच्या न्यायालयाचा विजय मल्ल्याला दणका, लंडनच्या घरातून बाहेर काढण्याचे आदेश
- ओमायक्रॉन डेल्टा व्हेरियंटविरुद्ध प्रतिकारशक्ती वाढवेल, पण यासाठी 'ही' गोष्ट करणं महत्त्वाचं- WHO