International Day of Peace : आपल्या जीवनात शांतीचे महत्व मोठं आहे. ज्या ठिकाणी शांती असते त्या ठिकाणी बंधुभाव, मधुरता, समाधान आणि आनंद असतो. शांतीविना जगण्याला कोणताच अर्थ नाही. याच शांततेचं महत्व सांगण्यासाठी जगभरात दरवर्षी 21 सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय शांती दिन  म्हणून साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा प्रमुख उद्देश म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर संघर्षाची परिस्थिती संपवून शांतीला प्रोत्साहन देणं आहे. आजच्या दिवशी 24 तास जगभरात अहिंसा आणि सीज फायरचे पालन करण्यात येतं.


संयुक्त राष्ट्राकडून आंतरराष्ट्रीय शांती दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. जगभरात शांतीचा संदेश देण्यासाठी संयुक्त राष्ट्रातर्फे साहित्य, संगीत, चित्रपट आणि खेळाच्या क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तींची नियुक्ती करण्यात आली आहे. 


 






आंतरराष्ट्रीय शांतता दिन हा जगभरातील शाळा, महाविद्यालयं आणि इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरा केला जातोय. आजच्या दिवशी पांढऱ्या कबुतरांना आकाशात मुक्त करण्यात येतं. पांढरी कबुतरं ही शांतीचे प्रतिक मानण्यात येतात.  


आंतरराष्ट्रीय शांतता दिनाचा इतिहास
जगभरातील संघर्ष संपून शांतीचा संदेश कायम राहण्यासाठी संयुक्त राष्ट्राने 1981 साली आंतरराष्ट्रीय शांती दिन साजरा करण्याचं ठरवलं. 1982 साली हा दिवस पहिल्यांदा साजरा करण्यात आला. त्यानंतर 2001 पासून या दिवशी जगभरात अहिंसा आणि सीज फायरच्या नियमाचे पालन करण्यात यावं असा ठराव करण्यात आला. दरवर्षी या दिवसाची एक विशेष थीम असते. या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय शांती दिवसाची थीम ही  'Recovering better for an equitable and sustainable world' अशी आहे. 


संबंधित बातम्या :