PHOTO : का साजरा केला जातोय World Ozone Day? जाणून घ्या त्यामागचे कारण...
दरवर्षी 16 सप्टेंबर हा दिवस जागतिक ओझोन दिवस म्हणून साजरा केला जातोय. पर्यावरणाचे संरक्षण आणि जागरुकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपृथ्वीच्या भोवताली असलेल्या ओझोनच्या थरामुळे सूर्यापासून येणाऱ्या अल्ट्राव्हॉयलेट किरणं तिथेच थांबतात. त्यामुळे सजिवांचे संरक्षण होतं आणि जगातली अन्न सुरक्षाही शाबूत राहते.
पण मानवाच्या विविध कृत्यांमुळे प्रदुषणामध्ये वाढ होऊन या ओझोनच्या थराला छिद्रे पडायला सुरुवात झाली आहे. परिणामी सजिवांचा जीव धोक्यात आला आहे.
1978 साली कॅनडातल्या मॉन्ट्रियल या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या एका परिषदेमध्ये ग्रीन हाऊस गॅसेस मुळे ओझोनच्या थरावर होणाऱ्या दुष्परिणामांबाबत चर्चा करण्यात आली.
वातावरणातील बदलाच्या संकटावर उपाय म्हणून ग्रीन हाऊस गॅसेसचे उत्सर्जन कमी करण्याचा ठराव या बैठकीत करण्यात आला. यावेळी मॉन्ट्रियल करार करण्यात आला.
हा करार आतापर्यंतचा सर्वात यशस्वी करार समजला जातो. या कराराला 197 देशांनी पाठिंबा दिला आहे.
जागतिक ओझोन दिवस साजरा करण्यासाठी दरवर्षी एक थीम तयार करण्यात येते. या वर्षीची थीम 'Montreal Protocol Keeping us, our food, and vaccines cool' अशी आहे.