International Day Of Families 2022 : संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे (United Nations) दरवर्षी 15 मे रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन (International Family Day) साजरा केला जातो. आरोग्य, शिक्षण, लैंगिक समानता, मुलांचे हक्क आणि सामाजिक समावेश यासारख्या कुटुंबांच्या कल्याणासाठी केंद्रस्थानी असलेल्या महत्त्वाच्या बाबींवर प्रकाश टाकण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
आजकालच्या जीवनात वाढत्या कामाच्या अभावी कुटुंबाला वेळ देणे, त्यांच्याशी संवाद साधणे, कुटुंबाबरोबर बाहेर फिरायला जाणे इतंच काय तर एक वेळचं एकत्र जेवणंसुद्धा होत नाही. आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनाच्या निमित्ताने याबाबतच जागरूकता निर्माण करण्यासाठी, कुटुंबाचे आपल्या मनातील स्थान टिकवून ठेवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनानिमित्त जाणून घ्या या दिनाचा इतिहास आणि महत्त्व.
आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनाचा इतिहास 2022 (International Day Of Families History) :
संयुक्त राष्ट्रांनी 1980 च्या दशकात कुटुंबाशी संबंधित समस्यांवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली. 1983 मध्ये, आर्थिक आणि सामाजिक परिषद, सामाजिक विकास आयोगाने, विकास प्रक्रियेत कुटुंबाच्या भूमिकेवर (1983/23) ठरावाची शिफारस केली. त्यानुसार हा दिन साजरा केला जाऊ लागला.
आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनाचे महत्त्व 2022 (International Day Of Families Importance) :
आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस कुटुंबांशी संबंधित समस्यांबद्दल जागरूकता वाढविण्यासाठी आणि कुटुंबांवर प्रभाव निर्माण करणाऱ्या सामाजिक, आर्थिक बाबींचे ज्ञान वाढविण्यासाठी हा दिन साजरा केला जातो. त्याचप्रमाणे, कुटुंबाचे महत्त्व अबाधित ठेवण्यासाठी प्रत्येकाला कुटुंबाविषयी प्रेम, आदर वाढविण्यासाठी या दिनाचे महत्त्व आहे.
महत्वाच्या बातम्या :