International Daughter's Day 2022 : आज जागतिक कन्या दिवस (International Daughter's Day). प्रत्येक आई-वडिलांसाठी तसेच मुलींसाठी आजचा दिवस खास आहे. कारण मुलगी ही निसर्गाने दिलेली एक सुंदर भेट आहे. ज्याच्या घरात मुलगी जन्माला येते ते खरंच खूप भाग्यवान असतात. कारण भारतीय संस्कृतीत मुलीला देवीचं, लक्ष्मीचं रूप मानलं जातं. घरात मुलगी जन्माला आली की 'पहिली बेटी धनाची पेटी' आपण बोलतो. याच मुलींचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी सप्टेबर महिन्याच्या शेवटच्या रविवारी 'डॉटर्स डे' साजरा केला जातो. 


मुलगी ही निसर्गाने दिलेली अशी एक भेट आहे. जी तिच्या साधेपणाने, आनंदाने उत्साहाने घरात चैतन्य निर्माण करते. मुली कर्तृत्ववान असतात, खंबीर असतात, स्वाभिमानी असतात. आज प्रत्येक क्षेत्रात मुलींनी मुलांच्या बरोबरीने समाजात आपलं स्थान निर्माण केलं आहे.


जागतिक कन्या दिनाचा इतिहास (International Daughter's Day History 2022) :


समाजातील मुलगा आणि मुलगी यांच्यातील खोल दरी कमी करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने यासाठी पुढाकार घेतला. मुलींचे महत्त्व ओळखून, संयुक्त राष्ट्र संघाने 11 ऑक्टोबर 2012 रोजी पहिल्यांदा मुलींचा सन्मान करण्यासाठी एक दिवस घोषित केला. संयुक्त राष्ट्रांच्या या उपक्रमाचे जगभरातील देशांनी स्वागत केले. तेव्हापासून प्रत्येक देशात मुलींसाठी एक दिवस साजरा केला जातो. भारतात हा दिवस दरवर्षी सप्टेंबरच्या शेवटच्या रविवारी साजरा केला जातो.


जागतिक कन्या दिनाचे महत्त्व (International Daughter's Day Importance 2022) :


मुली आज समाजात पुरुषांपेक्षा कितीही पुढ गेल्या असल्या तरी मात्र, अजूनही देशात, जगात असा समाज आहे ज्या ठिकाणी स्त्रीभृण हत्या, गर्भपात, महिला अत्याचार, यांसारखे प्रकार होतात. ही मानसिकता बदलण्यासाठी या दिवसाचं विशेष महत्त्व आहे. समाजात या दिवशी विविध जागरूकता निर्माण करणारे कार्यक्रम राबविले जातात. 


केवळ आजच्या दिवशी डॉटर्स डे साजरा करायचा का? केवळ आजच्या दिवशी मुलींचा सन्मान करायचा का? प्रत्येक दिवस हा मुलीच्या सन्मानाचा असायला हवा. 


मुलगी म्हणजे चूल आणि मूल ही संकल्पना आज मोठ्या प्रमाणात बदलली आहे. जे लोक आजही मुलीला कमी लेखतात त्यांना मुली कमजोर नसतात याची जाणीव करुन देण्याचा हा दिवस आहे. आपण आजूबाजूला अशी अनेक उदाहरणं पाहतो की जिथे मुलांनी आईवडिलांना वाऱ्यावर सोडलं, मात्र मुलींनी त्यांच्या आई-वडिलांची काळजी घेतली. अशी अनेक उदाहरणं पाहायला मिळतात जिथं मुलगी आयुष्यभर आपल्या आईवडिलांचा सांभाळ करते. यासाठीच मुली खूप खास असतात.


महत्वाच्या बातम्या :