मुंबई : ब्रिटीश ऑइल टँकर मार्लिन लुआंडाबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. मार्लिन लुआंडा या जहाजामधील तेल टँकरला लागलेल्या आगीला टोक्यात आणण्यात आल्याचे भारतीय नौदलाने (Indian Navy) सांगितले. या जहाजावर 22 भारतीय देखील होते. INS विशाखापट्टणम मधील अग्निशमन दल, 10 भारतीय नौदलाच्या कर्मचाऱ्यांसह विशेषज्ञ अग्निशमन उपकरणांसह ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आलेत. भारतीय नौदलाच्या सहा तासांच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणण्यात यश मिळवले. सध्या येथील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
येमेनच्या इराण-समर्थित हुथी बंडखोरांनी या जहाजाला लक्ष्य केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या जहाजावर 22 भारतीय आणि 1 बांगलादेशी कर्मचारी होते. ट्रेफिगुरा ट्रेडिंग फर्मच्या वतीने इंधन टँकर होता. दरम्यान या टँकरवर क्षेपणास्र हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या टँकरला आग लागल्याचं सांगण्यात येत होतं. एक ब्रिटिश तेल टँकर तसेच अमेरिकन युद्धनौका, यूएसएस कार्नी यावर देखील या गटाने हल्ला केला.
या घटनेला पाश्चात्य सैन्य आणि मध्य पूर्व यांच्यातील समुद्रात काही दशकांतील सर्वात मोठा संघर्ष मानला जातो. शिवाय, हुथी गटाने भारतीयांसह तेल टँकरवर हल्ला करण्याची ही पहिलीच वेळ नाही. 24 डिसेंबर 2023 रोजी समुद्रात येमेनच्या हुथी बंडखोरांनी उडवलेल्या ड्रोनने 25 भारतीयांना घेऊन जाणाऱ्या तेलाच्या टँकरला धडक दिली होती. हुथी गट गेल्या नोव्हेंबरपासून तेलाच्या टँकरवर हल्ले करत आहे आणि पॅलेस्टाईनमध्ये इस्रायलच्या लष्करी कारवाईमुळे असे होत असल्याचं म्हटलं जातंय.
भारतीय नौदलाने म्हटलं की, या घटनेमध्ये सध्या तरी कोणी जीवितहानी झाली नाही. तसेच या जहजाच्या जवळपास बचावासाठी देखील जहाजे आहेत. दरम्यान व्यावसायिक जाहजावर कोणताही हल्ला करणं आम्हाला मान्य नसल्याची प्रतिक्रिया युनायडेट किंगडमच्या सरकराने दिली आहे.
ही बातमी वाचा :
राज्यात थंडीचा जोर वाढणार, किती दिवस राहणार थंडी? सविस्तर माहिती एका क्लिकवर