Mian Mohammad Mansha:मुकेश अंबानी (Mukesh ambani) आणि गौतम अदानी (Gautam Adani) हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. हे तुम्हाला सर्वांना माहितच आहे. पण तुम्हाला आपल्या शेजारी असलेल्या पाकिस्तानमधील सर्वांत श्रीमंत व्यक्ती कोण? याबद्दल माहित आहे का? पाकिस्तानच्या अब्जाधीशांमध्ये मियाँ मोहम्मद मंशा (Mian Muhammad Mansha) यांचे नाव प्रथम आहे. मियाँ मोहम्मद यांचे भारताशी विशेष नाते आहे. खरे तर फाळणीपूर्वी त्यांचे कुटुंब भारतात राहायचे. अलीकडेच मोहम्मद मंशा यांनी पूर मदत निधीसाठी 69 लाख रुपये दिले आहेत.


भारताच्या शेजारीअसणारा पाकिस्तान सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. पीठ, तांदूळ, डाळी, बटाटे यांचे भाव गगनाला भिडले आहेत. मात्र गरिबीने ग्रासलेल्या पाकिस्तानातील काही लोकांकडे भरपूर संपत्ती आहे. पाकिस्तानच्या अशा श्रीमंत लोकांमध्ये मियाँ मुहम्मद मनशा यांचे नाव आहे. मियां मोहम्मद यांना पाकिस्तानचे मुकेश अंबानी असेही म्हणतात. मात्र, संपत्तीच्या बाबतीत मिया मनशा मुकेश अंबानी, गौतम अदानी आणि रतन टाटा यांसारख्या दिग्गजांच्या खूप मागे आहेत. पण मियाँ मंशा यांच्या नावाचा समावेश पाकिस्तानच्या टॉप उद्योगपतींमध्ये होतो.


भारताशी विशेष संबंध


मियाँ मुहम्मद मंशा यांचा भारताशी विशेष संबंध आहे. वास्तविक मियां मोहम्मद यांचा जन्म 1941 साली भारतात झाला. 1947 च्या फाळणीदरम्यान त्यांच्या कुटुंबाने पाकिस्तानला जाण्याचा निर्णय घेतला. याआधी ते भारतातच राहत होते. मुकेश अंबानींप्रमाणेच मोहम्मद मंशा हे परोपकारी, मोठा व्यवसाय आणि मेहनती वृत्तीसाठी ओळखले जातात. सध्या ते अब्जाधीश शाहिद खाननंतर पाकिस्तानातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.


पूर मदत निधीसाठी 69 लाख रुपयांची देणगी 


मियाँ मंशा हे परोपकरी आहेत. विविध येणाऱ्या संकटात ते मदत करत असतात. अलीकडेच पूर मदत निधीसाठी त्यांनी 69 लाख रुपयांची देणगी दिली होती. ते अनेक संस्थांमध्ये काम करतात. मियाँ मंशा यांना गाड्यांची खूप आवड आहे. त्यांच्याकडे मर्सिडीज, जग्वार, पोर्श, बीएमडब्ल्यू आणि रेंज रोव्हर सारख्या अनेक कार आहेत.


मियाँ मंशा यांची एकूण संपत्ती किती?


मिळालेल्या माहितीनुसार, मंशा यांची सध्याची एकूण संपत्ती सुमारे 5 अब्ज डॉलर आहे. हे भारतातील अब्जाधीश मुकेश अंबानी, गौतम अदानी, रतन टाटा आणि इतरांच्या निव्वळ संपत्तीच्या जवळपासही नाही. त्यांनी निशात कापड गिरणी सुरू केली. वडिलांच्या मृत्यूनंतर मंशा यांना हा वारसा मिळाला होता. सध्या, निशात समूह हा पाकिस्तानमधील कापडाचा सर्वात मोठा निर्यातदार आणि पाकिस्तानमधील सर्वात मोठा खासगी नियोक्ता आहे. कापूस व्यवसायाव्यतिरिक्त, अब्जाधीशांची कंपनी उर्जा प्रकल्प, सिमेंट, विमा व्यवसाय, बँका आणि इतर व्यवसायातही निशात समूहाचे वर्चस्व आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


अदानी-अंबानींच्या संपत्तीत घट, जागतिक क्रमवारीत घसरण; जाणून घ्या कोण कितव्या स्थानावर?