India Canada Relation : भारत आणि कॅनडा (India Canada Conflict) यांच्यातील तणाव आणखी वाढला आहे. कॅनडा (Canada) खलिस्तानींना पाठीशी घालत असलाचं दिसून येत असल्याने भारताने आता कॅनडाला झटका दिला आहे. भारताने आता कॅनडाला आपले 40 राजनैतिक अधिकारी परत बोलावण्यास सांगितलं आहे. भारतात सध्या कॅनडाचे 62 राजनैतिक अधिकारी कार्यरत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, भारत सरकारने कॅनडा सरकारला त्यांचे 40 मुत्सदी परत बोलावण्यास सांगितलं आहे. दरम्यान, याबाबत भारत सरकारकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.


मीडिया रिपोर्टनुसार, भारताने कॅनडाच्या अधिकाऱ्यांना 10 ऑक्टोबरपर्यंतची मुदत दिली आहे. तोपर्यंत कॅनडाने आपले 40 राजनैतिक अधिकारी माघारी बोलवावे, असं भारताने म्हटलं आहे. 


कॅनडाने खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंह निज्जर (Hardeep Singh Nijjar) च्या हत्येचा गंभीर आरोप भारतावर केल्यानंतर कॅनडासोबतचे संबंध दिवसेंदिवस ताणले जात आहे. भारत कॅनडाबाबत सातत्याने कठोर भूमिका घेत आहे. याआधी भारताने कॅनडाच्या नागरिकांसाठीची व्हिजा सेवा बंद केली आहे. 


खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंह निज्जरची हत्या


कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन टुड्रो (Justin Trudeau) यांनी संसदेत हरदीप सिंह निज्जरच्या हत्येमागे भारतीय गुप्तचर यंत्रणांचा हात असल्याचा गंभीर आरोप केला. भारताने हे आरोप पूर्णपणे फेटाळले आहेत. 18 जून रोजी हरदीप सिंह निज्जर कॅनडातील गुरुद्वाराबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. अज्ञात हल्लेखोरांनी हरदीप सिंह निज्जरवर अंधाधुंद गोळीबार केला. 


महत्वाच्या इतर बातम्या : 


Hardeep Singh Nijjar : 'होय, माझा बाप कॅनडाच्या गुप्तचर यंत्रणांशी संबंधित', पोरानं बिंग फोडल्याने कॅनडाच्या पंतप्रधानांचा पर्दाफाश