Nijjar and Canadian Intelligence Agency : खलिस्तानी दहशतवादी (Khalistani Terrorist) हरदीपसिंह निज्जर (Hardeep Singh Nijjar) कॅनडाच्या गुप्तचर संस्थेशी (Canadian Intel Officers) संबंधित असल्याची मोठी माहिती समोर आली आहे. निज्जरच्या मुलानेच यासंदर्भात मोठा गौप्यस्फोट केला आहे. खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंह निज्जर हा कॅनडाच्या गुप्तचर संस्थेच्या अधिकाऱ्यांच्या (Canadian Intelligence Agency) सतत संपर्कात होता. त्या अधिकाऱ्यांचीही अनेकदा भेट घेतली. हा खुलासा स्वतः निज्जर यांचा मुलगा बलराजसिंह निज्जर याने केला आहे.


खलिस्तानी निज्जरचे कॅनडाच्या गुप्तचर संस्थेशी संबंध


बलराजसिंह निज्जरने सांगितलं की, जूनमध्ये हरदीपसिंह निज्जरच्या हत्येच्या एक-दोन दिवस आधी कॅनेडियन सिक्युरिटी इंटेलिजन्स सर्व्हिस (CSIS) अधिकाऱ्यांशी बोलले होते. मात्र, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी हे सत्य आतापर्यंत जगापासून लपवून ठेवलं आहे. निज्जर यांच्या हत्येमागे भारत सरकारचे एजंट असल्याचा दावा त्यांनी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन टुड्रो यांनी संसदेत केला होता. हा आरोप भारताने फेटाळून लावला आहे.


कॅनडाच्यां पंतप्रधानांचा पितळ उघडं


हरदीपसिंग निज्जरचा मुलगा बलराज निज्जरने केलेल्या गौप्यस्फोटामुळे भारत आणि कॅनडाच्या राजनैतिक युद्धाला नवी कलाटणी मिळाली आहे. या वर्षी 18 जून रोजी सरे येथील गुरुद्वाराबाहेर हरदीप सिंह निज्जरची हत्या होण्याच्या काही दिवस आधी त्याने कॅनेडियन गुप्तचर संस्थांसोबत बातचीत केल्याचा दावा हरदीपसिंह निज्जरचा मुलगा बलराज याने केला आहे.


निज्जरची वरिष्ठ गुप्तचर अधिकाऱ्यांसोबत भेट


बलराजसिंह निज्जरने कॅनेडियन मीडियाला सांगितलं की, हरदीपसिंह निज्जरने हत्येच्या दोन ते तीन दिवसांपूर्वी कॅनडाच्या गुप्तचर यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. गुप्तचर अधिकाऱ्यांनी निज्जर यांना घरीच राहण्याचा सल्ला दिल्याचा दावाही बलराजने केला आहे.


निज्जरच्या मुलाकडून कॅनडाचा पर्दाफाश


हरदीपसिंह निज्जरचा मुलगा बलराजसिंह निज्जरने सांगितले की, त्याचे वडील (हरदीपसिंह निज्जर) कॅनेडियन सिक्युरिटी इंटेलिजेंस सर्व्हिस (CSIS) अधिकाऱ्यांना आठवड्यातून एक किंवा दोनदा भेटत होते. त्यांच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनंतरही एक बैठकही नियोजित करण्यात आली होती. फेब्रुवारी महिन्यापासून हरदीपसिंह निज्जर कॅनेडियन गुप्तचर अधिकार्‍यांसोबत भेटीगाठी सुरू केल्या आणि त्यानंतर या भेटीगाठी वाढल्याचंही बलराजने सांगितलं आहे.


भारत-कॅनडा संबंधांमध्ये तणाव


कॅनडाने केलेल्या गंभीर आरोपांचा भारताने पुरावा मागितला आहे. मात्र, कॅनडाने अद्याप यासंदर्भात कोणताही पुरावा सादर केलेला नाही. पंतप्रधान ट्रुडो यांच्या या आरोपानंतर भारत-कॅनडा संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. दोन्ही देशांनी एकमेकांच्या उच्च राजनैतिक अधिकाऱ्यांची हकालपट्टीही केली आहे. त्याचबरोबर भारताने कॅनडाच्या नागरिकांचा व्हिसाही निलंबित केला आहे.


महत्वाच्या इतर बातम्या :


India-Canada : भारतानं फटकारल्यानंतर कॅनडाचे पंतप्रधान नरमले! आता म्हणतायत, भारतासोबत संबंध महत्वाचे