China Moon Mission : चीन (China) आगामी चंद्र मोहिमेसाठी (Lunar Mission) सज्ज झाला आहे. चीन या चंद्रमोहिमेद्वारे पाकिस्तानलाही (Pakistan) मदत करणार आहे. चीन 2024 मध्ये चांग ई-6 ही चंद्र मोहिम (China Chang e-6 Lunar Moon Missio) राबवणार आहे. या चंद्र मोहिमेद्वारे चीन पाकिस्तानलाही चंद्रावर पोहोचण्यासाठी (China Lunar Mission) मदत करणार आहे. चीनच्या अंतराळ संशोधन संस्थेने सांगितलं आहे की, चांग ई-6 मिशनद्वारे पाकिस्तानचाही एक पेलोड चंद्रावर नेण्यात येणार आहे. या चीन आणि पाकिस्तानच्या या संयुक्त मोहिमेद्वारे दोन्ही देशांमधील मैत्रीचे संबंध अधिक दृढ होतील. चीन आणि पाकिस्तानच्या या मोहिमेकडे दोन मित्र देशांमधील अंतराळ क्षेत्रात वाढणारे सहकार्य म्हणून पाहिलं जात आहे.


चीन आणि पाकिस्तानची संयुक्त चंद्र मोहिम


चीनने याआधी महत्वाकांधी चंद्र मोहिमेबाबत घोषणा केली. यावेळी चीनने जाहिर केलं की, आगामी अंतराळ मोहिमेद्वारे चीन विविध देशांचे उपग्रह आणि पेलोड चंद्रावर नेण्याची योजना आखत आहे. चीनची अधिकृत वृत्तसंस्था शिन्हुआने 29 सप्टेंबर रोजी चायना नॅशनल स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (CNS) च्या हवाल्याने सांगितलं की, चांग ई-6 चंद्र मोहिम सध्या प्रगती पथावर असून संशोधन आणि विकासाचं काम सुरू आहे.


भारताचं चांद्रयान-3 दक्षिण ध्रुवावर पोहोचलंच नाही, चिनी शास्त्रज्ञांचा दावा


भारताच्या चांद्रयान-3 (Chandrayaan 3) ने चंद्राच्या (Moon) दक्षिण ध्रुवावर (Lunar South Pole) उतरून नवा इतिहास रचला. मात्र, भारताची चांद्रयान-3 मोहिम अयशस्वी झाल्याचा दावा करत आहे. भारताचं चांद्रयान-3 दक्षिण ध्रुवावर पोहोचलंच नाही, असा दावा चिनी शास्त्रज्ञ करत आहेत. त्यासोबत चीन चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाण्यासाठी चंद्र मोहिमेची तयारी सुरु आहे. चीनचाही चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याचा प्रयत्न असणार आहे.


चीन चंद्राच्या दक्षिण धुव्रावर पाठवणार रोबोट


आता चीनही दक्षिण ध्रुवावर पोहोचण्यासाठी सज्ज झाला आहे. चीन चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर रोबोट पाठवणार आहे. चीनने चांगई-6 या महत्त्वाकांक्षी चंद्र मोहिमेची घोषणा केली आहे. चीनची चंद्रमोहिम 2024 मध्ये लाँच केली जाणार आहे. चिनी अंतराळ संशोधन संस्था (China National Space Administration) म्हणजेच चायना नॅशनल स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन (CNSA) ने, आंतरराष्ट्रीय पातळीवर सहकार्यासाठी चीन चांग ई-6 (China Chang E-6 Mission) मोहिमेद्वारे विविध देशांचे उपग्रह अंतराळात नेणार आहे.


महत्वाच्या इतर बातम्या :


Chandrayaan 3 : भारताचं चांद्रयान-3 दक्षिण ध्रुवावर पोहोचलंच नाही, चिनी शास्त्रज्ञांचा दावा