Hong Kong singer Coco Lee Dead : हाँगकाँगची प्रसिद्ध गायिका आणि गीतकार कोको लीचं (Coco Lee) निधन झालं आहे. वयाच्या 48 व्या वर्षी तिने या जगाचा निरोप घेतला. कोको लीच्या बहिणींच्या फेसबुक पोस्टनुसार, कोको ली ने आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर तिचा मृत्यू झाला.
कोको ली ने 1998 मध्ये डिज्नी फिल्म मुलान चे शीर्षक गीत रिफ्लेक्शन गायले होते आणि एंग ली च्या 'क्राऊचिंग टायगर', 'हिडन ड्रॅगन' मधील 'अ लव्ह बिफोर टाईम' हे गाणं गाऊन ऑस्करमध्ये परफॉर्म करणारी पहिली गायिका ठरली होती. कोको लीच्या बहिणी, कॅरोल आणि नॅन्सी यांनी निवेदनात सांगितल्याप्रमाणे, कोको ली काही वर्षांपासून डिप्रेशनने त्रस्त होती. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून तिची प्रकृती अधिकच बिघडली.
आत्महत्येनंतर कोमात गेली होती कोको ली
कोको ली ने नैराश्याशी दोन हात करून लढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. तिने लोकांकडून व्यावसायिक मदतही मागितली. पण, ती नैराश्याचा सामना करू शकली नाही. कोको ली च्या बहिणींनी निवेदनात सांगितल्यानुसार, कोको ली ने 2 जुलै रोजी घरी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर तिला रूग्णालयात दाखल करण्यात आले. कोको ली ला कोम्यातून बाहेर काढण्यासाठी, तिला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. अखेर 5 जुलै 2023 रोजी तिचं निधन झालं," असे कोको ली च्या बहिणींनी निवेदनात म्हटलं आहे.
पॉप गायिका म्हणून यशस्वी कारकीर्द
कोको ली चा जन्म 1975 मध्ये हाँगकाँगमध्ये झाला. त्यानंतर ती अमेरिकेला गेली. या ठिकाणी तिने माध्यमिक आणि हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले. कोको ली ने आशिया खंडातील पॉप गायिका म्हणून अत्यंत यशस्वी कारकीर्द सुरू केली होती. सुरुवातीला ती मांडो-पॉप गायिका होती. आपल्या 30 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये कण्टोनीज आणि इंग्रजीमध्ये तिने काही अल्बमही रिलीज केले. कोको ली ने डिस्नेच्या मुलानच्या मंदारिन व्हर्जनमध्ये नायिका फा मुलानला आवाज दिला होता. रिफ्लेक्शन या थीम सॉंगची मँडरीन व्हर्जनही तिने गायली होती. सोनी म्युझिकने जागतिक स्तरावर ओळख करून देणारी ती पहिली चीनी गायिका होती.
महत्त्वाच्या बातम्या :