Pakistan On Rajnath Singh : भारत आणि पाकिस्तानमधील वाद हे आपल्यासाठी काही नवीन नाहीत. भारत आणि पाकिस्तान यांच्यामधल्या वादाचे मुख्य कारण म्हणजे पाकिस्तानने भारताविरूद्ध केलेले दहशतवादी कट. यासाठीच भारताने अनेकवेळा पाकिस्तानला दहशतवादाला पाठिंबा देणं बंद करण्याचा इशारा दिला आहे. भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी एका रॅलीत जम्मू-काश्मीर मुद्द्यावरून पाकिस्तान सरकारला इशारा दिला आणि सांगितले की, तुम्ही तुमचे घर सांभाळा. राजनाथ यांनी पाकव्याप्त काश्मीरमधील परिस्थितीबद्दल हे सांगितले आणि पीओके हा भारताचा भाग होता, आहे आणि राहील असेही सांगितले. दुसरीकडे, संधी मिळाली तर 'पाकिस्तानात घुसून आम्ही मारून टाकू', असेही म्हटले होते. 


भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या या वक्तव्यानंतर, शोएब मलिक नावाच्या पाकिस्तानी यूट्यूबरने पाकिस्तानी लोकांकडून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. दरम्यान, पाकिस्तानी जनतेने प्रत्युत्तर दिले की, 'सध्या पाकिस्तानसारखा मजबूत समुदाय आणि सैन्य नाही. आमच्या घरात घुसून आम्हाला मारण्याची हिंमत कोणी आतापर्यंत केली नाही. आम्ही इथले मालक आहोत.'


'आपण आपल्या देशाकडे अधिक लक्ष द्यायला हवे'


पाकिस्तान नेहमीच काश्मीरचा आंतरराष्ट्रीय मुद्दा घेऊन आला आहे. तर, भारत काश्मीरच्या मुद्द्यावरून नेहमीच पाकिस्तानला हा भारताचा अंतर्गत वाद असल्याचे कडक शब्दांत सांगत आला आहे. यामध्ये ढवळाढवळ न करण्याचा सल्लाही अनेकदा भारताकडून देण्यात आला आहे. काश्मीरच्या या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना आणखी एका पाकिस्तानी व्यक्तीने आपली प्रतिक्रिया दिली आहे. या प्रतिक्रियेत त्याने म्हटलं आहे की, इतर कोणत्याही देशाकडे लक्ष देण्यापेक्षा आपण आपल्या देशाकडे अधिक लक्ष दिलं पाहिजे. आपली परिस्थिती सुधारण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे.


'आम्ही बोलून कंटाळलो आहोत'


यूट्यूबरने भारत आणि पाकिस्तानमधील ठप्प झालेल्या व्यापारावरही पाकिस्तानी लोकांना प्रश्न विचारला. त्याला उत्तर देताना लोकांनी भारत आणि पाकिस्तानने पुन्हा व्यवसाय सुरू करावा, असे म्हटले आहे. इतर इस्लामिक देशांशी भारताच्या संबंधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पाकिस्तानी लोक म्हणाले की, हे काम आमच्या राज्यकर्त्यांनीही करायला हवे. आम्ही बोलून कंटाळलो आहोत. 


महत्त्वाच्या बातम्या :


Rajasthan : सोशल मीडियावर इन्फ्लुएन्सर्सना 5 लाखांपर्यंत मिळणार जाहिरात; राजस्थान सरकारची मोठी घोषणा