4-day work week  : जर्मनीची (Germany) अर्थव्यवस्था (economy) सध्या डबघाईला आली आहे. त्यामुळे जर्मन अर्थव्यवस्था संथ झाली आहे, ही देशासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. जर्मनीमध्ये मोठमोठ्या कंपन्यामध्ये नोकरकपातीचा निर्णय घेतला जातेय. त्यामुळे अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाचं वातावरण आहे. जर्मन अर्थव्यवस्थेला सध्या संघर्ष करावा लागत आहे. अर्थव्यवस्थेला गती मिळावी, यासाठी सर्वोतपरी प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच भाग म्हणून जर्मनीमधील कंपन्यांनी कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. एक फेब्रुवारीपासून चार दिवसांचा आठवडा सुरु करण्याचा निर्णय जर्मनीच्या काही कंपन्यांनी घेतला आहे.


आठव्यात चार दिवस काम - 


जर्मनीमधील 45 कंपन्यांनी कर्मचाऱ्यांसाठी आणि अर्थव्यवस्थेला गती मिळावी, त्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. कर्मचाऱ्यांसाठी आठव्यातून फक्त चार दिवसांचं काम असणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आठवड्यातून तीन दिवसांची सुट्टी मिळणार आहे. 


कधीपासून लागू होणार चार दिवसांचा आठवडा ?


जर्मनीमध्ये कंपन्यामध्ये कर्मचाऱ्यांसाठी फक्त चार दिवस काम करण्याचा निर्णय 1 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. कर्मचाऱ्यांना तीन दिवस ऑफ मिळणार आहे. 


किती दिवसांपर्यंत हा निर्णय असेल ?


जर्मनीमध्ये कर्मचाऱ्यांसाठी आठवड्यातून चार दिवस कामाचा निर्णय सहा महिन्यांसाठी करण्यात आला आहे. एक फेब्रुवारीपासून याची अंमलबजावणी होणार आहे. सहा महिन्यानंतर निकर्ष काढल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.  


चार दिवसांचा आठवडा का केला ?


कंपनीचं उत्पादन वाढवणं, कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या कमी करणं. तणाव, आजारपण किंवा बर्नआउटमुळे घेतल्या जाणाऱ्या सुट्ट्या कमी करणं. यामुळे कंपन्यांचे आणि जागतिक अर्थव्यवस्थेचे नुकसान कमी होण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे जर्मनीमध्ये चार दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय कंपन्यांनी घेतला आहे. 


पगार किती मिळणार ? 


आठवड्यात फक्त चार दिवस काम केलं तरी पगारामध्ये कोणतीही कपात केली जाणार नाही. कर्मचाऱ्यांना आधी मिळत होता, तेवढाच पगार मिळेल. कर्मचारी समान वेतनासाठी दर आठवड्याला कमी तास काम करतील. म्हणजेच चार दिवसांचा आठवडा झाला तरी कामाचे तासही आधीसारखेच राहतील. पण कर्मचाऱ्यांचं आऊटपूट सारखेच राहणार आहे.  


आतापर्यंत अर्थव्यवस्थेचं नुकसान किती झाले ?


फेडरल इन्स्टिट्यूट फॉर ऑक्युपेशनल सेफ्टी अँड हेल्थ नुसार, वर्ष 2022 मध्ये जर्मन लोक महिन्याचे सरासरी 21.3 दिवसही काम करू शकले नाहीत, ज्यामुळे 207 अब्ज युरो (अंदाजे 186558 7 कोटी 26लाख 6 0हजार 900 रुपये) चे नुकसान झाले. दरम्यान,  नाखूष कर्मचाऱ्यांमुळे कमी कामं झाली, ज्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला 2023 मध्ये €8.1 ट्रिलियन फटका बसला, असे ब्लूमबर्गने अहवाल दिले.