एक्स्प्लोर

Ganesh Chaturthi 2022 : गणेशोत्सवाचा उत्साह जर्मनीत! महाराष्ट्र मंडळ म्युनिकच्या वतीने जर्मनीत ढोल ताशा वाजवत, लेझीम खेळत थाटामाटात गणेशोत्सव साजरा

Ganesh Chaturthi 2022 : जर्मनीच्या म्युनिक शहरात कोरोनाच्या दोन वर्षानंतर पुन्हा एकदा वाजत गाजत बाप्पा विराजमान केला आहे.

Ganesh Chaturthi 2022 : सध्या महाराष्ट्रात सगळीकडेच गणोशोत्सवाची (Ganesh Chaturthi 2022) धामधूम, उत्साह आणि भाविकांचा जल्लोष पाहायला मिळतोय. तब्बल दोन वर्षांनंतर गणेशोत्सव साजरा केला जातोय. त्यामुळे भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. मात्र, गणोशोत्सवाचा हा उत्साह फक्त भारतातच नाही तर सातासमुद्रापार थेट जर्मनीपर्यंत (Germany) पोहोचला आहे. महाराष्ट्र मंडळ म्युनिकच्या वतीने जर्मनीत ढोल ताशाच्या गजरात, लेझीम खेळत थाटामाटात गणेशोत्सव साजरा केला जातोय.    

जर्मनीच्या म्युनिक शहरात कोरोनाच्या दोन वर्षानंतर पुन्हा एकदा वाजत गाजत बाप्पा विराजमान केला आहे. महाराष्ट्र मंडळ म्युनिकच्या वतीने जर्मनीत राहून सुद्धा गणेशोत्सवा सारखा मराठी सण अगदी उत्साहात साजरा करता यावा यासाठी 2016 पासून हा प्रयत्न केला जात आहे. अगदी महाराष्ट्रात ज्या उत्साहात ढोल-ताशा वाजवत, लेझीम खेळत बाप्पाची मिरवणूक काढून हा बाप्पा विराजमान केला जातो. अगदी तशाच प्रकारे जर्मनीत राहून या मंडळाने गणराज विराजमान केला आहे.

या गणेशोत्सवात फक्त महाराष्ट्र किंवा भारतीय नागरिक नाही तर जर्मनीतील स्थानिकसुद्धा उत्सुकतेपोटी आणि हा उत्साह पाहून सहभागी झाले आहेत. या मंडळात रोज 500 ते 1000 पेक्षा अधिक महाराष्ट्रीय त्यासोबतच जर्मनीमधील स्थानिक या मंडळात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी एकत्र आले आहेत.

म्युनिक शहराच्या मध्यवर्ती भागात गणेशोत्सव साजरा : 

म्युनिक शहराचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या ओडियनस्प्लाज या भागात मुख्य मिरवणूक निघाली होती. या ठिकाणी अनेक भाविक दर्शनासाठी आले. यावेळी जर्मनीत राहूनसुद्धा ढोल ताशा वाजवत 'रमणबाग ढोल ताशा पथक' वाजत गाजत या उत्सवाच्या निमित्ताने आपली संस्कृती परंपरा जपताना पाहायला मिळाले. 

परदेशात राहून सुद्धा आपल्या मराठी माणसाला गणेशोत्सव साजरा करता यावा, यासाठी आमचं मंडळ गणेशोत्वाचे आयोजन करते. बाप्पा विराजमन झाल्यावर पारंपरिक पद्धतीने पूजा आरती होते. त्याशिवाय संस्कृतिक कार्यक्रमसुद्धा आम्ही मंडळाच्या वतीने आयोजित करतो. त्यामुळे आमच्याबरोबर जर्मनीमधील स्थानिकसुद्धा या उत्सवात सहभागी होतात. त्यामुळे एक वेगळा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतो, असं मंडळाच्या वतीने विपुला घोसाळकर यांनी 'एबीपी माझा' शी बोलताना सांगितलं. 

महत्वाच्या बातम्या : 

 

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump : इराणला ज्या लोकांना मारायचं आहे त्या यादीत पहिल्या स्थानावर माझं नाव, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा, इराणवर मोठ्या हल्ल्याची ट्रम्प यांची धमकी
इराणला ज्या लोकांना मारायचं आहे त्या यादीत पहिल्या स्थानावर माझं नाव, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
'इराणसोबत हंगामी युद्धबंदी संपली..' एकाचवेळी शक्तीशाली 80 हल्ल्यानंतर ट्रम्प यांच्या वक्तव्याने जगाला पुन्हा धडकी भरली, इराणच्या तेल विक्रीला परवानगी देणारा परवाना सुद्धा रद्द
'इराणसोबत हंगामी युद्धबंदी संपली..' एकाचवेळी शक्तीशाली 80 हल्ल्यानंतर ट्रम्प यांच्या वक्तव्याने जगाला पुन्हा धडकी भरली, इराणच्या तेल विक्रीला परवानगी देणारा परवाना सुद्धा रद्द
शस्त्रसंधी अन् खामेनींची अंत्ययात्रा सुरु असतानाच अमेरिकेचा इराणच्या 80 हून अधिक ठिकाणांवर हवाई हल्ला; बहरीन आणि कुवेतमध्ये हल्ला करत इराणचा पलटवार
शस्त्रसंधी अन् खामेनींची अंत्ययात्रा सुरु असतानाच अमेरिकेचा इराणच्या 80 हून अधिक ठिकाणांवर हवाई हल्ला; बहरीन आणि कुवेतमध्ये हल्ला करत इराणचा पलटवार
Pahalgam Attack: लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदने पहलगाम हल्ल्याचा कट रचला; एनआयएच्या आरोपपत्रात आतापर्यंत झालेले पाच खुलासे
लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदने पहलगाम हल्ल्याचा कट रचला; एनआयएच्या आरोपपत्रात आतापर्यंत झालेले पाच खुलासे

व्हिडीओ

Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Multibagger Stock : एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे सहा महिन्यात बनले दीड लाख रुपये, मल्टीबॅगर स्टॉकची कमाल, शेअर किती रुपयावंर पोहोचला?
एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे सहा महिन्यात बनले दीड लाख रुपये, मल्टीबॅगर स्टॉकची कमाल, शेअर किती रुपयावंर पोहोचला?
Donald Trump : इराणला ज्या लोकांना मारायचं आहे त्या यादीत पहिल्या स्थानावर माझं नाव, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा, इराणवर मोठ्या हल्ल्याची ट्रम्प यांची धमकी
इराणला ज्या लोकांना मारायचं आहे त्या यादीत पहिल्या स्थानावर माझं नाव, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
KDMC Doctor Assault Case : शिंदेंच्या शिवसेनेचे मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक, तब्येत बिघडल्याने लागोलाग रुग्णालयात दाखल!
शिंदेंच्या शिवसेनेचे मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक, तब्येत बिघडल्याने लागोलाग रुग्णालयात दाखल!
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2025-26 चं व्याज कधीपर्यंत खात्यात जमा होणार?, केंद्रीय श्रम मंत्र्यांनीच तारीख सांगितली
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2025-26 चं व्याज कधीपर्यंत खात्यात जमा होणार? तारीख समोर
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
Sanju Samson : ...अन्यथा संजू सॅमसनला संघात घेऊ नका, अभिषेक नायर यांनी संजूला कोणत्या क्रमांकावर खेळवायचं हे सांगत महत्वाचा सल्ला दिला
संजूला टीममध्ये पुन्हा संधी दिल्यास कोणत्या क्रमांकावर खेळवायचं? अभिषेक नायर यांचं रोखठोक मत
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
Embed widget