Fire In China : मध्य चीनमधील हेनान प्रांतात (Henan) एका कारखान्याला लागलेल्या आगीत (Fire In China) सुमारे 36 जणांचा मृत्यू झाला आहे. एनयांग शहरातील (Anyang City fire) एका कारखान्यात ही घटना घडली. चिनी प्रसारमाध्यमांनी आज याबाबत माहिती दिली. या दुर्घटनेत दोन जण जखमी झाले आहेत, तर 2 जणांची ओळख पटलेली नाही. ही आग सोमवारी दुपारी चारच्या सुमारास आग लागली. ती विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना अनेक तास मेहनत घ्यावी लागली. तसेच 200 हून अधिक कर्मचारी आणि सुमारे 60 अग्निशमन दल याच्या मदतकार्यात सहभागी झाले होते. माहितीनुसार, एनयांग शहरातील हाय-टेक झोन कैक्सिंडा ट्रेडिंग कंपनी लिमिटेडमध्ये ही आग लागली. या घटनेनंतर परिसरात काही तास गोंधळ उडाला.


रुग्णालयात दाखल जखमींची प्रकृती ठीक


स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, अग्निशमन दलाच्या पथकांनी घटनास्थळी 63 गाड्या पाठवल्या होत्या. रात्री 8 वाजता आग आटोक्यात आणण्यात आली. तर रात्री 11 वाजेपर्यंत पूर्णपणे विझवण्यात आली. या दुर्घटनेत 36 जणांचा मृत्यू झाला असून दोघांना किरकोळ दुखापत झाल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात दाखल झालेल्या जखमींची प्रकृती सध्या ठीक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.


2015 मध्ये झाला होता मोठा स्फोट 


मार्च 2019 मध्ये, शांघायपासून 260 किमी अंतरावर असलेल्या यानचेंग येथील एका रासायनिक कारखान्यात स्फोट झाला होता. ज्यामध्ये 78 लोक ठार झाले. यामध्ये अनेक घरे उद्ध्वस्त झाली. तर 2015 मध्ये, चीनच्या सर्वात मोठ्या अपघातांपैकी एक, उत्तर टियांजिनमधील एकै गोदामात झालेल्या प्रचंड स्फोटात 165 लोक ठार झाले होते.


36 जणांचा मृत्यू, अद्याप दोन जण बेपत्ता
मंगळवारी सकाळपर्यंत या आगीत 36 जणांचा मृत्यू झाला आणि दोन जण किरकोळ जखमी झाले. त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. मात्र, अहवालानुसार अद्याप दोन जण बेपत्ता असल्याचं सांगण्यात येत आहे.


स्थानिक पोलिसांचा तपास सुरू
या घटनेचा तपास सुरू करण्यात आल्याचे स्थानिक पोलिसांनी सांगितले. मात्र आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलिसांनी काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. यापूर्वी मार्च 2019 मध्ये शांघायपासून 260 किलोमीटर अंतरावर असलेल्या यानचेंग येथील रासायनिक कारखान्यात स्फोट झाला होता. या दुर्घटनेत 78 जणांचा मृत्यू झाला असून अनेक घरे उद्ध्वस्त झाली आहेत. 2015 मध्ये, टियांजिन या उत्तरेकडील बंदर शहरातील रासायनिक गोदामात झालेल्या भीषण स्फोटात 170 हून अधिक लोक ठार झाले आणि 700 जण जखमी झाले.


इतर महत्वाच्या बातम्या


'दाऊदच्या हस्तकांकडून पंतप्रधान मोदींच्या हत्येचा कट'; अज्ञात ऑडिओ मेसेजनं खळबळ