एक्स्प्लोर

अमेरिकेच्या FBI मधील महिलेचं आयसीसच्या दहशतवाद्याशी लग्न

वॉशिंग्टन : एकीकडे अमेरिकेने सीरियातील आयसीस विरोधात युद्ध पुकारलं आहे, तर दुसरीकडे याच अमेरिकेची गुप्तहेर संघटनेच्या FBI एका महिला कर्मचारीने आयसीसच्या दहशतवाद्याशी लग्न केल्याचं समोर आलं आहे. ही महिला FBI साठी अनुवादिकेचं काम करत होती. तिच्याकडे आयसीससाठी तरुण भरती करणाऱ्या दहशतवाद्याच्या हालचालींवर नजर ठेवाण्याची जबाबदारी होती. पण तिने त्याच दहशतवाद्याशी आपलं सूत जळवल्याचं उघड झाल्यानं खळबळ उडाली आहे. सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार, डेनियल ग्रीन नावाच्या या महिलला FBI ने जानेवारी 2014 मध्ये सीरियात पाठवलं होतं. तिच्याकडे आयसीससाठी तरुणांची भरती करणारा जर्मन दहशतवादी डेनिस कसपर्टच्या हलचालींवर नजर ठेवण्याची जबाबदारी सोपावली होती. ग्रीनला जर्मन भाषा अवगत असल्याने, तिची या कामगिरीवर नेमणूक करण्यात आली होती. पण ग्रीनने सहा महिन्यातच डेनिसशी सूत जुळवून लग्न केलं आहे. अमेरिकेच्या एका न्यायाधीशाने या प्रकरणी गुप्तता पाळण्याचे आदेश दिले होते. पण नुकत्याच फेडरल कोर्टाच्या नोंदी सार्वजनिक झाल्याने हा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. ग्रीन ही मुळची झेकोस्लावाकियाची रहिवाशी असून, तिने आपल्या लग्नासंबंधीची माहिती गुप्त ठेवली होती. विशेष म्हणजे, तिने FBI च्या अधिकाऱ्यांच्या डोळ्यात धुळफेक करण्याचा प्रयत्न केला होता. आपल्या आई-वडिलांना भेटण्यासाठी जर्मनीला जात असल्याचे सांगून, आयसीसच्या एका हस्तकाच्या मदतीने ती तुर्कस्थान मार्गे सीरियात जात असे. डेनिसशी लग्न होण्यापूर्वी देखील ग्रीनचं आधी एक लग्न झालं होतं. पण आपल्या अमेरिकेच्या नोकरशाह पतीला घटस्फोट देण्यापूर्वीच तिनं डेनिसशी लग्न केलं. लग्न झाल्यानंतर ग्रीनला आपली चूक लक्षात आली. यानंतर आपल्या एका जवळच्या व्यक्तीला पत्र लिहून याबाबतची हकीकत सांगितली. यानंतर ती आयसीसच्या तावडीतून सुटल्यानंतर अमेरिकेत आली. तिच्याविरोधात न्यायालयीन सुनावणी झाल्यानंतर तिला दोन वर्षांचा तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती.

महत्त्वाच्या बातम्या

Indigo Flight Emergency Landing: दुबई-मुंबई इंडिगो विमानाचे राजकोटमध्ये आपत्कालीन लँडिंग, कार्गो कंपार्टमेंटमधून धूर येताच पायलटचा निर्णय, विमानात 194 प्रवासी
दुबई-मुंबई इंडिगो विमानाचे राजकोटमध्ये आपत्कालीन लँडिंग, कार्गो कंपार्टमेंटमधून धूर येताच पायलटचा निर्णय, विमानात 194 प्रवासी
Iran War Live Update: इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
युक्रेनमध्ये मालवाहू जहाजावर रशियाकडून क्षेपणास्त्र हल्ला, चार भारतीयांसह एकूण 10 जणांचा मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर  
युक्रेनमध्ये मालवाहू जहाजावर रशियाकडून क्षेपणास्त्र हल्ला, चार भारतीयांसह एकूण 10 जणांचा मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर  
Donald Trump: 'इराणसाठी नरकाचे दरवाजे उघडा' जॉर्डनमधील दोन सैनिकांच्या मृत्यूनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची संतप्त प्रतिक्रिया; इराणवर पुन्हा मोठा हवाई हल्ला
'इराणसाठी नरकाचे दरवाजे उघडा' जॉर्डनमधील दोन सैनिकांच्या मृत्यूनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची संतप्त प्रतिक्रिया; इराणवर पुन्हा मोठा हवाई हल्ला

व्हिडीओ

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chief Minister Wealth : देशातील सर्वात मोठा श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे?
सर्वात मोठा श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे? 
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
L&T Q1 Results: एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
Embed widget