Trending News : वडील हे मुलाचे सर्वात जवळचे मित्र असतात, असं म्हणलं जातं. सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. या व्हायरल व्हिडीओला नेटकऱ्यांची नेहमी पसंती मिळते. सध्या एका व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक नेटकरी भावूक झाले.


68 दिवसांमध्ये तयार केले मुलासाठी खास गिफ्ट 
एका  व्यक्तीचा लाकडी कार तयार करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. तुम्हाला वाटलं असेल की ही कार केवळ शो पिस म्हणून ठेवण्यात येणार आहे, तर असं नाहिये. ही कार तयार करण्यासाठी एका खास टेक्निकचा वापर केला आहे. या लाकडी कारमधील अनेक गोष्टी अॅटोमॅटीक आहेत.   ही कार केवळ 68 दिवसात तयार केली आहे.  पाहा या वूडन कारचा व्हिडीओ-






38 हजारपेक्षा जास्त लोकांनी पाहिला व्हिडीओ 
दिपांशू काबरा यांनी या लाकडी कारचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे.  38 हजारपेक्षा जास्त नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.  दिपांशू काबरा यांनी व्हिडीओ शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिले, ''वडिलांचे प्रेम' केवळ 68 दिवसात बनवलेली वूडन कार. मुलासाठी स्पेशल गिफ्ट. ' या व्हिडीओला तीन हजारपेक्षा जास्त लोकांनी पाहिले आहे. अनेकांनी व्हिडीओला कमेंट करून कार तयार करणाऱ्या व्यक्तीचे कौतुक केले आहे. 


इतर बातम्या :


Trending : बायडेन यांच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन, फोटो शेअर करत दिली माहिती


WFH in Corona : वर्क फ्रॉम होमचं हवं! 82 टक्के लोकांना ऑफिसला परतायची इच्छा नाही, अभ्यासात उघड


Coffee Benefits: दररोज किती कॉफी पिणे योग्य? पाहा कॉफीचे फायदे


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha