Trending News : प्रत्येकाला पाळीव प्राण्याची काळजी घेणे आणि त्यांच्यासोबत वेळ घालवणे आवडते. पाळीव प्राणी प्रत्येकाच्या हृदयात विशेष स्थान निर्माण करण्यात यशस्वी होतात. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) हे देखील प्राणीप्रेमी आहेत. नुकतेच त्यांनी एका जर्मन शेफर्डचे व्हाईट हाऊसमध्ये स्वागत केले, तर आता राष्ट्राध्यक्षांनी सोशल मीडियावर एक छायाचित्र शेअर करून व्हाईट हाऊसमध्ये नवीन पाहुण्याच्या आगमनाची माहिती दिली आहे.


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये हिरव्या डोळ्यांची लहान केसांची जर्मन टॅबी मांजर दिसत आहे. यासोबतच त्यांनी याला कॅप्शन देत लिहिले की, 'बिडेन कुटुंबात स्वागत आहे, विलो.' व्हाईट हाऊसमध्ये या मांजरीं आगमन झालं आहे. आता विलो नावाची ही सुंदर मांजर अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये जर्मन शेफर्ड कमांडरसोबत राहणार आहे.


बिडेन कुटुंबात सामील झालेली ही नवीन मांजर जॉर्ज डब्ल्यू बुश यांच्या कारकिर्दीनंतर व्हाईट हाऊसमध्ये राहणारी पहिली मांजर असेल. फर्स्ट लेडी जिल बायडेन यांच्या मायकेल लारोसा यांनी असोसिएटेड प्रेसला सांगितले की, पेनसिल्व्हेनिया या त्यांच्या मूळ गावी विलो ग्रोव्हच्या नावावरून या मांजरीचे नाव ठेवण्यात आले आहे.


मायकेल लारोसा यांनी सांगितले की, विलो 2020 मध्ये फर्स्ट लेडी जिल बायडेन यांना भेटली. त्यावेळी, जिल बायडेन पेनसिल्व्हेनियामध्ये त्यांच्या पतीच्या 2020 च्या निवडणूक प्रचारादरम्यान एका कार्यक्रमाला संबोधित करत होत्या. तेव्हा विलो तिथे अचानक स्टेजवर पोहोचली. त्यानंतर विलोला जिल बायडेनसोबत पाहून तिच्या मालकाने विलोला जिल बायडेन यांना देण्याचे ठरवले.


2009 मध्ये जॉर्ज डब्ल्यू बुश यांच्या पाळीव मांजर 'इंडिया'च्या मृत्यूनंतर व्हाईट हाऊसमध्ये प्रवेश करणारी विलो ही पहिली मांजर आहे. 'इंडिया' ही एक अमेरिकन शॉर्टहेअर मांजर होती जी जॉर्ज डब्ल्यू बुश यांच्या कुटुंबासोबत सुमारे दोन दशके राहिली.


इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha